Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2020 : इयॉन मॉर्गनचा खणखणीत षटकार अन् तिचं सेलिब्रेशन; कोण होती ती?IPL 2020 : इयॉन मॉर्गनचा खणखणीत षटकार अन् तिचं सेलिब्रेशन; कोण होती ती? By स्वदेश घाणेकर | Published: October 04, 2020 8:00 AMOpen in App1 / 14Indian Premier League ( IPL 2020) मध्ये शाहजाह येथे झालेला दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि कोलकात नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यातल्या सामन्यात चौकार-षटकारांनी आतषबाजी पाहायला मिळाली. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw), श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी पहिल्या डावात तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर DCने तगडं आव्हान उभं केलं. 2 / 14नितिश राणा ( Nitish Rana), इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) आणि राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) यांनीही KKRसाठी जोरदार फटकेबाजी केली. क्रिकेट प्रेमींना अपेक्षित असाच हा सामना झाला. पण, यावेळी विजयाचे पारडे दिल्लीच्या पारड्यात पडले. 3 / 14KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पृथ्वी आणि शिखर धवन यांनी DCला पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून दिली. धवन 16 चेंडूंत 26 धावांवर माघारी परतल्यानंतर पृथ्वी आणि कर्णधार श्रेयस यांनी षटकारांचा वादळच आणलं. पृथ्वीनं यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानं 41 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 66 धावा केल्या. 4 / 14रिषभ पंत 17 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 38 धावांत माघारी परतला. श्रेयसनं 38 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकारांसह नाबाद 88 धावा केल्या. आंद्रे रसेलनं अखेरच्या षटकात एक विकेट घेत 7 धावा दिल्या. दिल्लीने 4 बाद 228 धावा चोपल्या. 5 / 14प्रत्युत्तरात KKRच्या सलामीवीरांकडूनही स्फोटक सुरुवात अपेक्षित होती. नितिश राणा आणि शुबमन गिल यांनी दमदार खेळ केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. गिल 22 चेंडूंत 28 धावा करून माघारी परतला. 6 / 14हर्षल पटेलच्या एका षटकात सामना फिरवला. हर्षलने ( Harshal Patel) KKRच्या दोन्ही सेट फलंदाजांना बाद केले. तत्पूर्वी, कागिसो रबाडानं KKR चा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल ( 13) याला रोखले. नितिश राणा 35 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार मारून 58 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कार्तिक ( 6) बाद झाला. धावांचा डोंगर डोळ्यासमोर असल्यामुळे KKR दडपणाखाली गेले. 7 / 14इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) आणि राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) यांनी पाच षटकांत 78 धावा चोपून सामन्यातील चुरस कायम राखली. मॉर्गन 18 चेंडूंत 1 चौकार व 5 षटकार खेचून 44 धावांवर बाद झाला. 8 / 146 धावांत 26 धावांची गरज असताना त्रिपाठीनं पहिल्या चेंडूवर चौकार खेचला. पण, मार्कस स्टॉयनिसनं दुसऱ्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. त्रिपाठी 16 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार मारून 36 धावांवर माघारी परतला. त्यानंतर DCने हा सामना जिंकला. KKRला 8 बाद 210 धावाच करता आल्या. 9 / 14इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी हे खेळपट्टीवर असेपर्यंत KKRला विजयाच्या आशा होत्या. त्यात मॉर्गनच्या खणखणीत षटकारानंतर पेव्हेलियनमध्ये एक तरुणी बेभान होऊन सेलिब्रेशन करताना दिसली. त्यानंतर ती कोण होती, हे जाणून घेण्याचा शोध सुरू झाला.10 / 14KKRच्या याआधीच्या सामन्याला शाहरुख खान त्याच्या कुटुंबीयांसह उपस्थित होता. आज त्याची कन्या सुहाना स्टेडियमवर संघाला चिअर करताना दिसली.11 / 1412 / 1413 / 1414 / 14 आणखी वाचा Subscribe to Notifications