Join us  

IPLमधील सर्वोत्तम कर्णधार कोण? आकडेवारी सांगते रोहित शर्मा अन् MS Dhoni नव्हे, तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 3:29 PM

Open in App
1 / 10

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. IPL 2020चे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.

2 / 10

कोरोना व्हायरसच्या संकटात IPL 2020वरही अनिश्चिततेचं सावट होतं. पण, BCCIनं सर्व संकटांवर मात करून अखेर 13वे पर्व संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. IPL 2020च्या तोंडावर आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार सर्वोत्तम कर्णधार कोण हे जाणून घेऊया...

3 / 10

महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा जगातल्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून तो ओळखला जातो. शिवाय इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) त्याने चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) तीन जेतेपद जिंकून दिली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली CSKने 174 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 59.8 टक्के सामने जिंकले आहेत.

4 / 10

डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner ) नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)ने 2016मध्ये जेतेपद पटकावले होते. SRHने प्लेऑफमध्ये सातत्यानं धडक मारली आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास वॉर्नरने नेतृत्व केलेल्या 47 सामन्यांमध्ये SRHची विजयाची टक्केवारी ही 55.3 इतकी आहे.

5 / 10

विराट कोहली ( Virat Kohli) यंदा इंडियन प्रीमिअर लीगचा ( Indian Premier League) जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी आतुर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bangalore) तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला, पण त्यांना अपयश आलं. RCBचे नेतृत्व सांभाळणाऱ्या कोहलीला 110 सामन्यांत 44.5 टक्केच विजयांत रुपांतर करता आले आहेत.

6 / 10

रोहित शर्मा ( Rohit Sharma) हा IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यानं मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) सर्वाधिक चार जेतेपद जिंकून दिली आहेत. पण, विजयाची टक्केवारी पाहता त्याला 104 सामन्यांत 57.7 टक्केच यश मिळाले आहे.

7 / 10

दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) तिसरे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. त्यानं 36 सामन्यांत KKRसंघाचे नेतृत्व केलं असून त्याची विजयाची टक्केवारी 47.2 इतकी आहे.

8 / 10

दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals ) कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) नं गतवर्षी संघाल प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून दिला. 2012नंतर दिल्लीनं प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. श्रेयसनं 24 सामन्यांत दिल्लीचे नेतृत्व सांभाळले आणि त्याची विजयाची टक्केवारी 54.2 इतकी आहे.

9 / 10

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) 2008नंतरचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे. त्यानं 29 सामन्यांत RRचे नेतृत्व केले आणि त्याची विजयाची टक्केवारी ही सर्वाधिक 56.5 टक्के आहे.

10 / 10

लोकेश राहुल ( KL Rahul) यंदा किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.

टॅग्स :आयपीएल 2020महेंद्रसिंग धोनीस्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नररोहित शर्माविराट कोहलीलोकेश राहुल