Join us  

IPL 2020 : ऋतुराज गायकवाडची दमदार कामगिरी; कॅलिस, वीरू, कोहली यांच्या पंक्तित पटकावलं स्थान

By स्वदेश घाणेकर | Published: November 01, 2020 8:40 PM

Open in App
1 / 9

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) Indian Premier League ( IPL 2020) १३व्या पर्वातील अखेरच्या साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) पराभवाचा धक्का दिला.

2 / 9

IPL 2020च्या प्ले ऑफमधून बाद झालेल्या CSKनं विजयाची हॅटट्रिक साजरी करताना KXIPचे आव्हानही संपुष्टात आणले. प्ले ऑफच्या सामन्यात आव्हान कायम ठेवण्यासाठी KXIPला हा सामना जिंकणे गरजेचे होते, परंतु आता त्यांचेही पॅकअप झाले.

3 / 9

करा किंवा मरा या सामन्यात पंजाबचे महत्त्वाचे खेळाडूच अपयशी झाले आणि त्याचा मोठा भुर्दंड त्यांना भरावा लागला. CSKनं IPL2020चा विजयानं निरोप घेतला. ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी CSKचा विजय पक्का केला.

4 / 9

पंजाबनं दीपक हुडाच्या ३० चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर ६ बाद १५३ धावांचा पल्ला गाठला. प्रत्युत्तरात CSKचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी KXIPच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला.

5 / 9

ख्रिस जॉर्डननं KXIPला पहिलं यश मिळवून दिलं. फॅफ ३४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ४८ धावांवर माघारी परतला. पण, गायकवाड एका बाजूने खेळपट्टीवर नांगर रोवून होता. त्यानं अंबाती रायुडूसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

6 / 9

चेन्नईनं ९ विकेट्स राखून विजय मिळवला. गायकवाड ४९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६२ धावावंर, तर रायुडू ३० धावांवर नाबाद राहिला.

7 / 9

8 / 9

चेन्नई सुपर किंग्सकडून सलग तीन सामन्यांत ( ६५*, ७२, ६२*) अर्धशतक झळकावणारा ऋतुराज गायकवाड पहिलाच फलंदाज ठऱला.

9 / 9

या सामन्यात ऋतुराजला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार मिळाला. त्यानं सलग तिसऱ्या सामन्यात हा पुरस्कार जिंकला. जॅक कॅलिस ( २०१०), वीरेंद्र सेहवाग ( २०१२), ग्लेन मॅक्सवेल ( २०१४), आरोन फिंच ( २०१६), विराट कोहली ( २०१६) आणि जोस बटलर ( २०१८) यांनी सलग तीन सामन्यांत पुरस्कार जिंकला आहे.

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सकिंग्स इलेव्हन पंजाब