राजस्थान रॉयल्स 2008चा मॅजिक IPL 2020तही दाखवणार; स्टीव्ह स्मिथ इतिहास रचणार?

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) पहिल्या पर्वातील विजेत्या राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) संघ UAEत 2008चा मॅजिक पुन्हा करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांनी तीनवेळा प्ले ऑफमध्ये प्रवेशा केला आहे.

युवा खेळाडूंना संधी देणाऱ्या या संघानं यंदाही IPL Auction 2020 मध्ये तीन युवा खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतले आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी RRसज्ज झाले आहेत.

बलस्थान - राजस्थान रॉयल्सकडे ( RR) बेन स्टोक्स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर हे परदेशी खेळाडू आहेत. स्टोक्स, आर्चर आणि बटलर हे इंग्लंडच्या ( 2019) वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य आहेत. RRसाठी हे मॅच विनर खेळाडू मुख्य बलस्थान आहेत.

स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखाली RR 2008मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज आहेत.

अनुभवी खेळाडूंसह RRचे युवा खेळाडू आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहेत. यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि कार्तिक त्यागी हे 19 वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू यंदा IPL 2020 गाजवण्यासाठी आतुर आहेत.

कमकुवत बाबी - सलामीची जोडी कोणती असेल, हा यक्षप्रश्न RRसमोर असेल. राजस्थाननं IPL Auction 2020त 11 खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. त्यात रॉबीन उथप्पा, टॉम कुरन, डेव्हीड मिलर आणि अँण्ड्य्रू टाय हे अनुभवी खेळाडू आहेत. शिवाय त्यांनी जयदेव उनाडकट व ओशाने थॉमस यांना पुन्हा संघात घेतले. 17 वर्षीय यशस्वी जैसवाललाही त्यांनी 2.40 कोटींत खऱेदी केलं.

फलंदाजांची फौज असली तरी गोलंदाजांचे पर्याय त्यांच्याकडे नाहीत. जयदेव उनाडकट ( 8.4 कोटी), वरूण आरोन ( 2.4 कोटी) आणि ओशाने थॉमस ( 1.10 कोटी) हे पर्याय त्यांच्याकडे आहेत, परंतु त्यांच्यात सातत्य नाहीत.

X फॅक्टर - वर्ल्ड कप विजेता जोफ्रा आर्चर हा RRचा X फॅक्टर ठरू शकतो. 2019च्या मोसमात त्यानं 11 सामन्यांत 6.67च्या इकॉनॉमी रेटनं 11 विकेट्स घेतल्या आहेत.

राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals Players List (RR) - अंकित राजपूत, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, महिपाल लोम्रो, मनन वोहरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटीया, रियान पराग, संजू सॅमसन, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, स्टीव्हन स्मिथ, वरुण अॅरोन, रॉबीन उथप्पा, जयदेव उनाडकट, यशस्वी जैस्वाल, कार्तिक त्यागी, अनुज रावत, आकाश सिंग, डेव्हीड मिलर, ओशाने थॉमस, अनिरुद्ध अशोक जोशी, टॉम कुरण, अँड्रे टे.

राजस्थान रॉयल्सचे संपूर्ण वेळापत्रक ( Rajasthan Royals Time Table IPL 2020) 22 सप्टेंबर, मंगळवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह 27 सप्टेंबर, रविवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह 30 सप्टेंबर, बुधवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई 3 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी

6 ऑक्टोबर, मंगळवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी 9 ऑक्टोबर, शुक्रवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह 11 ऑक्टोबर, रविवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान ऱॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई 14 ऑक्टोबर, बुधवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई 17 ऑक्टोबर, शनिवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई

19 ऑक्टोबर, सोमवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी 22 ऑक्टोबर, गुरुवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई 25 ऑक्टोबर, रविवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी

30 ऑक्टोबर, शुक्रवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी 1 नोव्हेंबर, रविवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई