Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2021: एक अतरंगी...तर दुसरा सतरंगी...मॅक्सवेल, डीव्हिलियर्सनं KKRला मजबूत धुतलं!IPL 2021: एक अतरंगी...तर दुसरा सतरंगी...मॅक्सवेल, डीव्हिलियर्सनं KKRला मजबूत धुतलं! By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 6:15 PMOpen in App1 / 9आयपीएलमध्ये रविवारच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) कोलकाता नाइट रायडर्सच्या (KKR) गोलंदाजांचा समाचार घेत २०५ धावांचं आव्हान दिलं आहे. पण आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली होती. दुसऱ्याच षटकात दोन विकेट्स पडल्या होत्या. 2 / 9वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर विराट कोहली (५) आणि रजत पाटिदार (२) धावांवर बाद झाले होते. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं आरसीबीचा डाव सांभाळून संघाला सामन्यात पुनरागमन करुन दिलं. 3 / 9मैदानात अतरंगी फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅक्सवेलनं कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मॅक्सवेलनं सामन्यात सर्वाधिक ७८ धावांची खेळी साकारली. 4 / 9मॅक्सवेलनं मैदानाच्या कानाकोपऱ्यांमध्ये फटकेबाजी करत ४९ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्यानं ७८ धावांची खेळी साकारली. 5 / 9देवदत्त पडिक्कल बाद झाल्यानंतर मैदानात एबी डीव्हिलियर्स आला आणि एका 'अतरंगी' खेळाडूला मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात षटकारांची उधळण करणाऱ्या 'सतरंगी' खेळाडूची साथ मिळाली.6 / 9ग्लेन मॅक्सवेल आणि डीव्हिलियर्सनं केकेआरच्या गोलंदाजांना नेस्तनाभूत करत अर्धशतकी भागीदारी रचली. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर डीव्हिलियर्सनं संघाची कमान सांभाळत कोणताही दबाव निर्माण न होऊ देता आपला नैसर्गिक खेळ केला. 7 / 9सामन्याच्या अखेरच्या पाच षटकांमध्ये एबी डीव्हिलियर्स नावाचं वादळ पाहायला मिळालं. डीव्हिलियर्नं जबरदस्त फटकेबाजी करत आरसीबीच्या धावसंख्येला दोनशे पार नेलं. 8 / 9डीव्हिलियर्सनं अवघ्या ३४ चेंडूत खणखणीत ९ चौकार आणि तीन उत्तुंग षटकांच्या सहाय्यानं नाबाद ७६ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. 9 / 9डीव्हिलियर्स आणि मॅक्सवेलच्या तडफदार खेळीच्या जोरावर आरसीबीला २० षटकांच्या अखेरीस ४ बाद २०४ धावा करता आल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications