Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2021: मुंबईतील वानखेडे मैदान...सोबतीला 'विराट' समुद्र अन् घोंगावलं 'पडिक्कल' वादळ!IPL 2021: मुंबईतील वानखेडे मैदान...सोबतीला 'विराट' समुद्र अन् घोंगावलं 'पडिक्कल' वादळ! By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 11:47 PMOpen in App1 / 10मुंबईतील वानखेडे मैदान...सोबतीला असलेला धावांचा समुद्र अर्थात विराट कोहली आणि समुद्रात नव्हे, तर मैदानात घोंगावलेलं 'पडिक्कल' नावाचं वादळ पाहून सर्व क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. 2 / 10रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं आज राजस्थान रॉयल्सने दिलेलं १७८ धावांचं आव्हान एकही विकेट न गमावता मोठ्या दिमाखात गाठलं. पण सर्वात लक्षवेधी गोष्ट ठरली युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल यांचं वादळी शतक. 3 / 10देवदत्त पडिक्कल यानं आज आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलंवहिलं शतक साजरं केलं. पडिक्कलनं राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत अवघ्या ५२ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी साकारली. 4 / 10देवदत्त पडिक्कलनं सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक अंदाजात सुरुवात करत राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पडिक्कलनं केलेल्या नाबाद १०१ धावांमध्ये ६ उत्तुंग षटकार आणि तब्बल ११ खणखणीत चौकारांचा समावेश आहे. 5 / 10. यंदाच्या आयपीएलमध्ये युवा फलंदाजांची जोरदार चलती पाहायला मिळत आहे. याआधी राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार संजू सॅमसन यानं यंदाच्या आयपीएलमधलं पहिलं शतक ठोकलं. त्यानंतर आज पडिक्कलने राजस्थान विरोधात शतकी खेळी साकारली आहे. 6 / 10पडिक्कलनं आपल्या भात्यातील सुरेख आणि नजाकती फटक्यांचा नजराणा पेश करत मैदानात चहूबाजूंना दमदार फटके लगावले. पडिक्कलचा आक्रमक अंदाज पाहून कर्णधार विराट कोहली देखील भारावला होता. 7 / 10राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना पडिक्कलनं सुरुवातीपासूनच आक्रमक अंदाजात फलंदाजीला सुरुवात केली होती. तर कोहलीनं संथ सुरुवात केली. पण मैदानात जम बसवल्यानंतर कोहलीनंही आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. कोहलीनं ४७ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. यात ३ उत्तुंग षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. 8 / 10देवदत्त पडिक्कल याला यंदाच्या सीझनला सुरुवात होण्याआधी कोरोनानं गाठलं होतं. त्यावरही मात करुन पडिक्कल मैदानात परतला. पडिक्कल याला पहिल्या सामन्याला मुकावं लागलं होतं. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात पडिक्कलला सुर गवसला नव्हता. 9 / 10यूएईमध्ये खेळविल्या गेलेल्या गेल्या आयपीएलच्या सीझनमध्येच पडिक्कलनं आरसीबीकडून सर्वाधिक धावा करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 10 / 10विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लारा यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये देवदत्त पडिक्कलचं शतक झालेलं पाहायला आवडेल असं म्हटलं होतं आणि आज त्यांची इच्छा पडिक्कलनं पूर्ण देखील केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications