Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2021: "होय, मी चुकलो! माझं वय झालंय आणि...", महेंद्रसिंग धोनीनं प्रांजळ मनानं दिली कबुलीIPL 2021: "होय, मी चुकलो! माझं वय झालंय आणि...", महेंद्रसिंग धोनीनं प्रांजळ मनानं दिली कबुली By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 10:31 AMOpen in App1 / 9आयपीएलमध्ये सोमवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी होती. वाढत्या वयामुळे आधीसारखा आक्रमक खेळी साकारणारा धोनी राहिलेला नाही अशी टीका केली होती. त्याला जशासतसं प्रत्युत्तर देण्याची संधी काल धोनीकडे होती.2 / 9चेन्नईला चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर पहिल्या फळीतले फलंदाज बाद झाले होते आणि शेवटच्या सहा षटकांमध्ये धोनीकडे संघाच्या धावसंख्येला मोठं स्वरुप देण्याची जबाबदारी होती. पण धोनीला यात अपयश आलं. धोनीला १७ चेंडूत केवळ १८ धावा करता आल्या. 3 / 9चेन्नई सुपरकिंग्जनं अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या संथ कामगिरीमुळे संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही. वीस षटकांच्या अखेरीस चेन्नईनं राजस्थानसमोर १८८ धावा करता आल्या. चेन्नईच्या गोलंदाजांनी सामना फिरवल्यामुळे संघाला विजय प्राप्त करता आला खरा पण सामना झाल्यानंतर धोनीनं एक मोठं विधान केलं. 4 / 9वाढत्या वयामुळे युवा खेळाडूंच्या फिटनेसशी जुळवून घेणं हे खूप कठीण काम आहे. माझी सुरुवात खूप संथ झाली, अशी प्रांजळ कबुली कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं दिली आहे. 5 / 9'मला वाटतं आम्हाला आणखी धावा करता आल्या असत्या. मी खेळलेले पहिले सहा चेंडू आम्हाला इतर कुठल्या सामन्यात महागात पडले असते. जेव्हा तुम्ही मैदानात खेळत असता तेव्हा तुम्हाला कुणी अनफिट म्हटलेलं नक्कीच आवडणार नाही. या वयात कामगिरीची हमी देता येत नाही', असं धोनीनं कबुल केलं आहे. 6 / 9'मी वयाच्या २४ व्या वर्षी असताना कामगिरीची हमी देऊ शकत नव्हतो. तर आता ४० व्या वर्षी हमी देणं खूप कठीण आहे. निदान मी अनफिट असल्याचं बोट कुणी माझ्याकडे दाखवू शकत नाही हे माझ्यासाठी खूप सकारात्मक आहे', असंही धोनी म्हणाला. 7 / 9मला युवा खेळाडूंसारखी चपळता राखायला हवी. ते खूप धावतात. ते खूप चपळ आहेत. त्यांना आव्हान देणं हे माझ्यासाठी चांगलंच आहे, असं धोनीनं सांगितलं. 8 / 9राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात धोनीला फलंदाजीत काही योगदान देता आलं नसलं तरी एक कर्णधार म्हणून त्यानं उत्तम कामगिरी केली आणि विजय प्राप्त केला. 9 / 9सामन्यात अतिशय अचूक गोलंदाजांची निवड आणि योग्य क्षेत्ररक्षणाच्या धोनीच्या चलाखीमुळे चेन्नई सुपरकिंग्जला राजस्थानला थोपवता आलं. चेन्नईनं राजस्थानवर तब्बल ४५ धावांनी विजय प्राप्त केला. या विजयामुळे चेन्नईच्या रनरेटमध्येही कमालीची वाढ झाली आणि संघ गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications