Join us  

Andre Russell : आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ तंबूत पाठवला, अनेक विक्रमांचा पाऊस पाडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 10:21 PM

Open in App
1 / 10

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांची फटकेबाजी वगळता Mumbai Indiansच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. Kolkata Knight Riders च्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं.

2 / 10

रोहितचा आजचा खेळ फार संथ वाटला. त्यात हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, इशान शर्मा यांच्याकडूनही अपेक्षित कामगिरी न झाल्यानं MI ला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत ५ विकेट्स घेत मुंबईला मोठे धक्के दिले. मुंबईनं अखेरच्या पाच षटकांत ७ विकेट्स गमावल्या.

3 / 10

IPL 2021मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकला ( २) फार कमाल दाखवता आली नाही. वरूण चक्रवर्थीनं दुसऱ्याच षटकात त्याला राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) जराही दडपण न घेता आक्रमक खेळ केला.

4 / 10

सूर्या व रोहित शर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. सूर्यानं ३६ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५६ धावा चोपल्या. रोहितनं ३२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. कमिन्सनं २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सचा डाव १५२ धावांवर गडगडला.

5 / 10

अवघ्या दोन षटकांत पाच विकेट्स घेणारा आंद्रे रसेल हा आयपीएल इतिहासातील पहिलाच गोलंदाज ठरला

6 / 10

आंद्रे रसेलनं १५ धावांत ५ विकेट्स घेतल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून ही आयपीएलमधील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. यापूर्वी हा विक्रम सुनील नरीन ( 5/19) याच्या नावावर होता.

7 / 10

पाच विकेट्स घेतल्यानंतर आंद्रे रसेलनं KKRच्या लोगोला किस केलं. हर्षल पटेल याच्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध एका डावात पाच विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला.

8 / 10

आतापर्यंत ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये फक्त पाच गोलंदाजांना दोन षटकांत पाच विकेट्स घेता आल्या आहेत. आंद्रे रसेल याच्याआधी राशिद खान ( वि. आयर्लंड, २०१७), अंकित राजपूत ( वि. त्रिपुरा, २०१९), विल विलियम्स ( वि. वेलिंग्टन, २०२०) व खिझार हयात ( वि. हाँगकाँग, २०२०) यांनी हा पराक्रम केला आहे.

9 / 10

मुंबई इंडियन्सविरुद्धी ही प्रतिस्पर्धी गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. आंद्रे रसेलनं १५ धावांत ५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर हर्षल पटेल ( ५-२७), रोहित शर्मा ( ४-६, २००९) आणि सॅम्युएल बद्री ( ४-९, २०१७) यांचा क्रमांक येतो.

10 / 10

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स