Join us  

IPL 2021, MI vs RR Qualification chances : गतविजेत्या मुंबई इंडियन्ससाठी 'Do or Die' सामना; आज राजस्थान रॉयल्सनं बाजी मारल्यास काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 6:04 PM

Open in App
1 / 6

IPL 2021, MI vs RR Qualification chances : गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) अशा वेळेचा सामना करावा लागेल असे कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते. मुंबईनं यापूर्वी अनेकदा मुसंडी मारून प्ले ऑफचे गणित जुळवले आहे, परंतु यावेळेस ते थोडे जास्तच अडचणीत सापडले आहेत.

2 / 6

दिल्ली कॅपिटल्स ( २० गुण), चेन्नई सुपर किंग्स ( १८ गुण) व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( १६) यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. आता चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाइट रायडर्स ( १२), पंजाब किंग्स ( १०), राजस्थान रॉयल्स ( १०) व मुंबई इंडियन्स ( १०) हे शर्यतीत आहेत. त्यामुळे आजचा सामना मुंबई इंडियन्स ( MI) प्रमाणे राजस्थान रॉयल्स ( RR) सह अन्य दोन संघांसाठी महत्त्वाचा आहे.

3 / 6

- आजचा सामना जर राजयस्थान रॉयल्सनं जिंकल्यास, तर ते १२ गुणांसह कोलकाता नाइट रायडर्सच्या बरोबरीत जाऊन पोहोचतील. त्यामुळे गुरुवारी RR vs KKR हा सामना चौथ्या स्थानासाठीचा शूटआऊट सामना ठरेल. यात जो जिंकेल तो प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल.

4 / 6

- पण, जर मुंबई इंडियन्सनं बाजी मारल्यास प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची आशा कायम राहतील, त्यांनी अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादला नमवल्यास प्ले ऑफमधील प्रवेश पक्का होऊ शकतो, पण राजस्थाननं कोलकातावर विजय मिळवणं गरजेचं आहे. जर कोलकाता जिंकल्यास खराब नेट रन रेटमुळे मुंबईचे आव्हान संपुष्टात येईल.

5 / 6

- जर मुंबईनं राजस्थानला हरवले अन् सनरायझर्सनंकडून हरले आणि राजस्थाननं कोलकाताला हरवले, तर तिन्ही संघांच्या खात्यात १२ गुण होतील. पंजाबेन चेन्नईला हरवल्यास तोही या पंक्तित येईल. तरीही सर्वोत्तम नेट रन रेटच्या जोरावर कोलकाता बाजी मारेल

6 / 6

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स
Open in App