आयपीएलमध्ये काल कोलकाता नाईटरायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या लढतीत कोलकात्याच्या नितीश राणाने धमाकेदार फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. त्याने या लढतीत ५६ चेंडूत ८० धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
नितीश राणा याने आपल्या या खेळीदरम्यान ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. त्याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर खास अंदाजामध्ये आनंद व्यक्त केला. त्याने बोटामधील रिंगकडे इशारा केला. त्यावरून त्याने ही खेळी पत्नी सांची मारवाह हिला समर्पिक केली असावी, असे वाटले.
नितीश राणा आणि सांची यांचा विवाह फेब्रुवारी २०१९ मध्ये झाला होता. नितीश राणा सध्या केकेआरचा प्रमुख खेळाडू आहे. मात्र त्याच्या पत्नीबाबत लोकांना फार कमी माहिती आहे. सांची पेशाने इंटिरियर डिझायनर आङे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती बॉलीवूड अभिनेत्रींएवढीच सुंदर आहे.
सांचीने आपल्या करिअरची सुरुवात २०१५ मध्ये झाली होती. तिने अंसल विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ सुशांत स्कूल ऑफ डिझाइनमधून शिक्षण घेतले होते. सांचीने अनेक नामवंत इंटिरियर डिझायनरकडून ट्रेनिंग घेतले आहे.
नितीश आणि सांची एकमेकांवर किती प्रेम करतात हे छायाचित्रांमधून दिसून येते. त्यांची जोडी खूप सुंदर आहे. सांची एका मुलाखतीत म्हणाली होती की, जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो होतो तेव्हा आम्ही एकमेकांपेक्षा खूप वेगळे होते. आमची जीवनशैली खूप वेगळी होती. आमचे बॅकग्राऊंडही वेगळे होते. मला पार्टी करायला, पार्टीमध्ये जायला आवडायचे. तर नितीश हा लाजाळू आणि घरातच राहणारा तरुण होता. मात्र आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत.
या कपलने मुलाखतीत सांगितले होते की, दोघांमध्ये अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होते. नितीश राणा म्हणाला की, आमच्या खोलीत एक उशी आहे. त्यावरूनही आमच्यामध्ये भांडण होते.
अजून एका मुलाखतीत नितीश राणा याने सांगितले की, विवाहापूर्वी आम्ही तीन वर्षे एकमेकांना डेट केले. सांचीचा भाऊ परमवीर आणि नितीशचा भाऊ एकत्र फुटबॉल खेळायचे. क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यावर नितीशसुद्धा त्यांच्यासोबत खेळायचा. तर सांची तिथे फिरायला जायची.
नितीशने सांगितले की, त्याच फुटबॉलच्या ग्राऊंडवर मी सांचीला पहिल्यांदा पाहिले. त्यानंतर मला समजले की ती परमवीरची बहीण आहे. आधी मी त्यांना मेसेज केला. माझी सुरुवातीपासूनच लव्ह मॅरेज करण्याची इच्छा होती. मी माझ्या प्रशिक्षकांनाही सांगितले होते की, २४-२५ व्या वर्षी मी लग्न करेन.