Join us  

IPL 2021 Qualifier 1, CSK vs DC: चेन्नई सुपर किंग्स खेळणार २३वा प्लेऑफ सामना, असा आहे धोनीसेनेचा जबरदस्त रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 2:24 PM

Open in App
1 / 7

आयपीलएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी ११व्या वेळी नॉकआऊटमध्ये स्थान मिळवले आहे. आजपर्यंत कुठल्याही संघाला चेन्नईपेक्षा अधिकवेळा प्लेऑफमध्ये पोहोचता आलेले नाही.

2 / 7

एमएस धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यान रविवारी आयपीएल २०२१चा पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी गुणतक्त्यात पहिल्या दोन स्थानांवर राहत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.

3 / 7

तीन वेळची चॅम्पियन चेन्नईची नजर गेल्या वेळचे अपयश विसरून यावेळी आपल्या शिरपेचात विजयाचा तुरा खोवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर गेल्या वर्षीचे उपविजेते असलेल्या दिल्लीची नजर पहिल्या विजेतेपदावर असेल.

4 / 7

आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ रविवारी २३ वा प्लेऑफ सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये चेन्नईचा हा १२ हंगामातील २३ वा प्लेऑफ सामना असेल.

5 / 7

आयपीएलच्या १२ हंगामात ११व्यांदा नॉकआऊट राऊंडमध्ये स्थान मिळवले आहे. आजपर्यंत कुठलाही संघ चेन्नईपेक्षा अधिकवेळा प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेला नाही.

6 / 7

धोनीच्या टीमने २००८ पासून २०१५ पर्यंत सातत्याने ८ वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर पुढच्या दोन वर्षांसाठी चेन्नईवर बंदी घालण्यात आली होती.

7 / 7

२०१८ मध्ये चेन्नईने पुनरागमन करताना प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. एवढेच नाही तर अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारत विजेतेपदही पटकावले होते. २०१९ मध्येही चेन्नईने अंतिम फेरीपर्यंत धडक दिली होती. गेल्या हंगामात पहिल्यांदाच चेन्नईचा संघ पहिल्यांदाच बाद फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरला होता.

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी
Open in App