Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2021 : मॉरिसच्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, वीरूसह नेटिझन्स म्हणाले...IPL 2021 : मॉरिसच्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, वीरूसह नेटिझन्स म्हणाले... By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 9:02 AMOpen in App1 / 11आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या रोमांचक लढतीत राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर ३ विकेट्सनी मात केली. यंदाच्या हंगामातील राजस्थानचा हा पहिला विजय ठरला. 2 / 11राजस्थानच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो ख्रिस मॉरिस. मॉरिसने निर्णायक क्षणी १८ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी केली. त्याने अखेरच्या षटकात टॉम करणला षटकार ठोकत राजस्थानला विजय मिळवून दिला. दरम्यान, ख्रिस मॉरिसच्या या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. 3 / 11पंजाबविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने ख्रिस मॉरिसवर विश्वास न दाखवता त्याला स्ट्राइक दिली नव्हती. त्यावरून चर्चाही रंगली होती. दरम्यान, दिल्लीविरोधात तुफानी खेळी करत मॉरिसने सॅमसनला चुकीचे ठरवले. 4 / 11मॉरिसच्या या खेळीनंतर नेटिझन्सनी अनेक मिम्स शेअर केले असून, कुणी या खेळीला पैसा वसूल खेळी म्हटलेय. तर कुणी त्याला पूर्ण सन्मान हवाय असं म्हटलं आहे. 5 / 11मॉरिसच्या या खेळीनंतर राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाने पैसा वसूल भाईसाब, अशी प्रतिक्रिया दिली असेल, असे सागर नावाच्या युझरने म्हटले आहे. 6 / 11जेठालाल नावाच्या युझरने ट्विट केले की, गेल्या सामन्यात ट्रोल झाल्यानंतर मॉरिस आजच्या खेळीनंतर माझी कामगिरी पाहा, असं म्हणत असेल. 7 / 11आपल्या वैशिष्टयपूर्ण ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सेहवागनेही मॉरिसबाबत ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो. पहिल्या सामन्यात पैसे मिळाले पण सन्मान नाही. मात्र या लढतीत पैसे आणि सन्मान दोन्ही मिळाले. 8 / 11सामना संपल्यानंतर ख्रिस मॉरिसचं ड्रेसिंग रूममध्ये असं स्वागत झालं असेल. 9 / 11सामन्यानंतर दिल गार्डन गार्डन हो गया, अशी प्रतिक्रिया मॉरिसने दिली असेल असे एक नेटिझन्स म्हणतो. 10 / 11मॉरिसच्या आजच्या खेळीनंतर त्याच्याकडून काहीतरी शिक, असा सल्ला राजस्थानच्या संघव्यवस्थापनाने संजू सॅमसनला देत असेल, असे मिम्स एकाने शेअऱ केले आहे. 11 / 11तर आजच्या खेळीनंतर माझ्या पॉवरकडे दुर्लक्ष करू नको, असे मॉरिस सॅमसनला सांगत असेल, असे मिम्सही एकाने ट्विट केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications