Join us  

चौकार नको, जीव अडकला षटकारात! RR मध्ये परतले ३ तगडे फलंदाज; ९ महिन्यात ठोकलेत २३६ षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 5:08 PM

Open in App
1 / 9

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघामध्ये आज आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील खेळाडूंची कमतरता असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दोन्ही संघ वेगळ्या खेळाडूंना घेऊन खेळणार आहेत. राजस्थानच्या संघातून बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर यांची कमतरता आहे. तर पंजाबमध्ये डेविड मलान, रायली मेरेडिथ हे दोन खेळाडू नसणार आहेत. तरीही आजच्या सामन्या षटकारांचा पाऊस पडू शकतो यात शंका नाही.

2 / 9

दोन्ही संघांमध्ये चौकारांपेक्षा षटकारांवर भर देणारे शेरास सव्वाशेर खेळाडू आहेत. पंजाब किंग्जच्या ताफ्यात 'सिक्सर किंग' ख्रिस गेलचा समावेश असला तर राजस्थानच्या संघात आत दोन तगड्या खेळाडूंचं पुनरागमन होणार आहे. या दोन खेळाडूंनी गेल्या ९ महिन्यात एकूण २३६ षटकार ठोकलेत. यावरुन त्यांच्या फलंदाजी शैलीचा आपण अंदाज बांधू शकतो.

3 / 9

दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या देशांचे असले तरी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ते एकत्र आले की मैदानात कहर करु शकतात. न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स आणि इंग्लंडचा लियाम लिविंगस्टोन आज राजस्थानच्या संघातून खेळणार आहेत. याशिवाय वेस्ट इंडिजच्या एविन लुईसला देखील आज संधी मिळू शकते.

4 / 9

ग्लेन फिलिप्स आणि एविन लुईस यंदा पहिल्यांदाच राजस्थानकडून खेळणार आहेत. दोन्ही खेळाडू आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात सहभागी नव्हते. तर लिविंगस्टोननं कोरोना प्रादुर्भावामुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता.

5 / 9

आता हे तिघंही राजस्थानसाठी धमाल खेळ करायला सज्ज झाले आहेत. ग्लेन फिलिप्स यानं यंदाच्या वर्षात आतापर्यंत ८७ षटकार ठोकले आहेत. तर लियाम लिविंगस्टोनच्या नावावर ८१ षटकार आहेत. दुसरीकडे एविन लुईस यानं यंदाच्या वर्षात आतापर्यंत ६८ षटकार ठोकले आहेत.

6 / 9

तिघांचीही षटकारांची आकडेवारी पाहता तिघंही जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसून येतं. त्यामुळे पंजाब किंग्जकडे जरी गेल नामक हुकमी अस्त्र असलं तरी राजस्थान देखील तीन तगड्या खेळाडूंसह मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे.

7 / 9

त्यामुळेच आजच्या सामन्यात षटकारांचा पाऊस पडताना दिसू शकतो. लिविंगस्टोननं या वर्षात दी हंड्रेड, व्हायटीलिटी ब्लास्टसारख्या स्पर्धांसह इंग्लंडसाठी देखील तुफान फलंदाजी केली आहे. त्यानं यंदाच्या वर्षात ३३ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. यात ४४.९२ च्या सरासरीनं १५७.७३ च्या जबरदस्त स्ट्राइकरेटनं १२१३ धावा कुटल्या आहेत. त्याच्या बॅटमधून ८१ चौकार आणि ८१ षटकार निघाले आहेत. यंदाच्या वर्षात टी-२० विश्वात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत लिविंगस्टोन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

8 / 9

दुसरीकडे न्यूझीलंडचा २४ वर्षीय ग्लेन फिलिप्स पहिल्यांचा आयपीएलमध्ये खेळणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्यानं यंदाच्या वर्षात अफलातून कामगिरी आहे. फिलिप्सनं ४५ सामन्यांत १५३ च्या स्ट्राइकरेटनं १२६३ धावा कुटल्या आहेत. यंदाच्या वर्षात त्यानं आतापर्यंत ७८ चौकार आणि ८७ षटकार ठोकले आहेत.

9 / 9

वेस्ट इंडिजच्या एविन लुईसनं याआधी मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आता तो राजस्थानसाठी खेळणार आहे. लुईसनं यंदाच्या वर्षात टी-२० करिअरमध्ये २४ सामने खळले आहेत आणि यात १६३.९८ च्या सरासरीनं ८१० धावा ठोकल्या आहेत. यात ५६ चौकार आणि ६८ षटकारांचा समावेश आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सपंजाब किंग्स
Open in App