Join us  

IPL 2021, RCB vs KKR T20 : काल काव्या अन् आज धनश्री!; RCBच्या विजयानंतर युझवेंद्र चहलची पत्नी झाली भावूक, Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 8:23 PM

Open in App
1 / 7

IPL 2021, RCB vs KKR T20 Live Score Update : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएल २०२१मधील विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. रविवारी झालेल्या पहिल्या डबल हेडर सामन्यात RCBनं कोलकाता नाईट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders) दणदणीत विजय मिळवला.

2 / 7

ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) व एबी डिव्हिलियर्सच्या ( AB de Villiers) फटकेबाजीनं KKRच्या गोलंदाजांना हतबल केले. युझवेंद्र चहलचा ( Yuzvendra Chahal) फॉर्म परतल्यानं कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावरील आनंद आणखी द्विगुणीत झाला. आयपीएलच्या इतिहासात RCBनं प्रथमच पर्वातील सलग तीन सामन्यांत विजय मिळवला.

3 / 7

दोनशे + लक्ष्याचा पाठलाग करताना KKRला साजेशी सुरुवात करता आली नाही. शुबमन गिल ( २१) व राहुल त्रिपाठी ( २५) लगेच बाद झाले. युझवेंद्र चहलनं आयपीएल २०२१मधील पहिली विकेट घेताना नितीशला ( १८) बाद केले. दिनेश कार्तिकही ( २) युझीच्या फिरकीवर पायचीत झाला.

4 / 7

कर्णधार इयॉन मॉर्गन व शाकिब अल हसन ही जोडी KKRची खिंड लढवत होती. पण, हर्षल पटेलनं २९ धावा करणाऱ्या मॉर्गनला बाद केले. अखेरच्या पाच षटकांत KKRला ८४ धावांची गरज होती. शाकिब व आंद्रे रसेल ही जोडी मैदानावर होती, परंतु सुरूवातीला पडलेल्या विकेट्समुळे त्यांच्यावरील दडपण वाढलेले होते.

5 / 7

चहलनं टाकलेल्या १७व्या षटकात आंद्रे रसेलनं ( ६,४,४,४,१,१) असा २० धावा चोपल्या. त्यामुळे विराटचा पारा चढलेला पाहायला मिळाला. चहलनं ४ षटकांत ३४ धावांत २ विकेट्स घेतल्या. शाकिबनं ( २६) मोक्याच्या क्षणी विकेट फेकली. आंद्रे रसेल २० चेंडूंत ३१ धावांत बाद झाला अन् KKRचा पराभव निश्चित झाला. ४ बाद २०४ धावांच्या प्रत्युत्तरात KKRला ८ बाद १६६ धावाच करता आल्या. RCBनं हा सामना ३८ धावांनी जिंकला.

6 / 7

पहिल्या दोन सामन्यात एकही विकेट घेऊ न शकलेल्या चहलनं आज विकेट घेतल्यानं त्याची पत्नी धनश्री वर्मा भावूक झाली.

7 / 7

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरयुजवेंद्र चहलकोलकाता नाईट रायडर्स