IPL 2021 : रोहित शर्मानं सामना गमावला पण मन जिंकलं; त्याच्या सामाजिक जाणीवेचे इंग्लंडच्या दिग्गजानं कौतुक केलं!

Indian Premier League 2021 : मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) आयपीएलच्या १४व्या पर्वातही पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

MIनं २०१२ मध्ये आयपीएल पर्वातील पहिला सामना जिंकला होता आणि त्यानंतर सलग ९ वर्ष त्यांना पर्वातील पहिला सामना जिंकण्यात अपयश आलं.

रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुर्दैवीरित्या धावबाद होऊन १९ धावांवर माघारी परतला. MI कडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या ख्रिस लीन ( ४९), सूर्यकुमार यादव ( ३१), इशान किशन ( २८) यांनी छोटेखानी योगदान देताना मुंबईला ९ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारून दिली.

हर्षल पटेलनं २७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. कायले जेमिन्सन व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.IPL 2021 : MI vs RCB T20 Live Score Update

लक्ष्याचा पाठलाग करताना, विराट कोहली व वॉशिंग्टन सुंदर सलामीला आले, परंत सुंदर लगेच माघारी परतला. पदार्पणवीर रजत पाटीदारही फार कमाल करू शकला नाही. विराट कोहली ( ३३) व ग्लेन मॅक्सवेल ( ३९) यांनी अर्धशतकी भागीदारी करताना सामन्यात कमबॅक केले.

दोघंही माघारी परतल्यानंतर एबी डिव्हिलियर्सवर जबाबदारी आली. त्यानं २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा करताना सामना चुरशीचा बनवला. हर्षल व मोहम्मद सिराजनं २ चेंडूंत २ धाव घेत RCB चा विजय पक्का केला.IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score

रोहित शर्मानं हा सामना गमावला असला तरी त्याच्या एका कृतीनं इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हीन पीटरसन याचं मनं जिंकलं. या सामन्यात रोहित शर्मा एकशिंगी गेंड्याचा फोटो असलेले बूट घालून मैदानावर उतरला. जगभरात एकशिंगी गेंड्यांची संख्या कमी होत चालली आहे आणि त्यांच्या रक्षणासाठीच्या मोहीमेत रोहित सहभागी झाला आहे.

रोहितला ब्रँड अँम्बेसिडरही केलं आहे आणि रोहितची कन्या समायरा हिचं नाव गेंड्याच्या एका मुलीला देण्यात आले आहे. पीटरसनही याच मोहिमेचा भाग आहे आणि म्हणून त्यानं रोहितचं कौतुक केलं आहे.