Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2021: पर्यावरण स्नेही रोहित शर्मा; KKRविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा हिटमॅनच्या बुटांची चर्चा!IPL 2021: पर्यावरण स्नेही रोहित शर्मा; KKRविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा हिटमॅनच्या बुटांची चर्चा! By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 4:07 PMOpen in App1 / 6मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) कामगिरीपेक्षा बुटांची चर्चा अधिक सुरू आहे. RCBविरुद्धच्या पहिल्या सामन्यात एकशिंगी गेंड्याचा फोटो असलेले बुट घालून रोहित मैदानावर उतरला होता. रोहित हा एकशिंगी गेंड्याच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातीला वाचवण्यासाठीच्या मोहिमेचा भाग आहे. त्यामुळे त्यानं तशी बुटं घातली होती.2 / 6मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) विरुद्धच्या सामन्यात रोहित निळ्या रंगाच्या बुटांसह मैदानावर उतरला होता आणि त्यातूनही त्यानं पर्यावरण स्नेही संदेश दिला. त्याच्या या बुटांवर कासवाचे चित्र होते. 3 / 6समुद्रातील प्रदुषणामुळे होणाऱ्या परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी रोहितनं ती बुटं घातली होती. समुद्रात प्लास्टिक फेकू नका, असा मॅसेज त्याला सर्वांना द्यायचा आहे. 4 / 6KKR विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मानंही १ षटक फेकलं. १४व्या षटकाचा पहिलाच चेंडू टाकताना रोहित शर्माचा पाय मुरगळला होता. त्यानंतर रोहित मैदानावरच बसला. वेदनेनं विव्हळत असलेल्या रोहितसाठी MIची वैद्यकिय टीम धावून आली. MIच्या चाहत्यांमध्ये टेंशन वाढत होतं. पण, रोहितनं प्राथमिक उपचार घेत ते षटक पूर्ण केलं. त्यानं ९ धावा दिल्या.5 / 6त्यानंतरही रोहित संघाला अडचणीत सोडून मैदानाबाहेर गेला नाही, तर अखेरपर्यंत खेळाडूंना मार्गदर्शन करत राहिला आणि आक्रमक क्षेत्ररक्षण लावून KKRच्या फलंदाजांवर दडपण टाकले. त्यामुळेच KKRला सोपा विजय मिळवता आला नाही.6 / 6 आणखी वाचा Subscribe to Notifications