Join us  

IPL 2021, RR vs RCB : हर्षल पटेलची आणखी एक हॅटट्रिक हुकली, पण IPLमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 9:52 PM

Open in App
1 / 6

IPL 2021, RR vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( Royal Challengers Bangalore) गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या ( Rajasthan Royals) सामन्यात दमदार पुनरागमन केलं. बिनबाद ७७ धावांवर असणाऱ्या RRच्या ९ विकेट्स त्यांनी पुढील ७२ धावांत टिपले. राजस्थानला ९ बाद १४९ धावांवर समाधान मानावे लागले. पर्पल कॅपच्या शर्यतीत प्रचंड पुढे असलेल्या हर्षल पटेलची ( Harshal Patel) आणखी एक हॅटट्रिक हुकली, पण, त्यानं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

2 / 6

यशस्वी जैस्वाल व एव्हिन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ७७ धावा जोडल्या. यशस्वीनं २२ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा केल्या. लुईसनं ३७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावा केल्या. त्यानंतर बघताबघता राजस्थानचा डाव गडगडला.

3 / 6

शाहबाज अहमदनं एकाच षटकात दोन धक्के दिले. त्यानंतर युझवेंद्र चहलनं कमाल दाखवली. हर्षलनं अखेरच्या षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या, पण यावेळी त्याची हॅटट्रिक हुकली. अखेरच्या चेंडूवर त्यानं आणखी एक विकेट घेतली.

4 / 6

युझवेंद्र चहलनं १८ धावांत २, शाहबाज अहमदनं १० धावांत २ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं ३४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या या पर्वात त्यानं २६ विकेट्स घेतल्या आहेत आणि आयपीएल इतिहासात एकाच पर्वात अनकॅप गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

5 / 6

यंदाच्या आयपीएलमध्ये हर्षलनं मुंबई इंडियन्सविरुद्ध एकाच सामन्याच पाच विकेट्सचा पराक्रम केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईविरुद्धच हॅटट्रिक घेतली. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यानं १७ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या. यापूर्वी युझवेंद्र चहलनं २०१५च्या पर्वात २३ विकेट्स घेतल्या होत्या. RCBकडून एकाच पर्वात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही हर्षलनं आज मोडला.

6 / 6

या पर्वात हर्षलनं आणखी ७ विकेट्स घेतल्यात तो ड्वेन ब्राव्होचा ३२ विकेट्सचा विक्रम मोडू शकतो

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स
Open in App