Cricket Buzz»फोटो गॅलरी »Spirit of Cricket : RCBनं एका धावेनं जिंकला सामना अन् विराट कोहलीच्या 'त्या' कृतीनं जिंकली कोट्यवधी मनं!Spirit of Cricket : RCBनं एका धावेनं जिंकला सामना अन् विराट कोहलीच्या 'त्या' कृतीनं जिंकली कोट्यवधी मनं! By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 7:30 AMOpen in App1 / 10रिषभ पंत व शिमरोन हेटमायर यांनी खेचून आणलेल्या सामन्यात मोहम्मद सिराजनं टाकलेलं २०वं षटक निर्णयाक ठरलं. त्या षटकातील एका निर्धाव चेंडूनं सामन्यालाच कलाटणी दिली अन्यथा आणखी एका सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळाला असता. 2 / 10रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या सलामीवीरांनी पुन्हा मान टाकली.विराट कोहली ( १२) आणि देवदत्त पडीक्कल ( १७) माघारी परतले. अमित मिश्रानं RCBला मोठा धक्का देताना ग्लेन मॅक्सवेलला ( २५) माघारी जाण्यास भाग पाडले. 3 / 10एबी डिव्हिलियर्स व रजत पाटिदार यांनी RCBचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३८ धावांत ५४ धावांची भागीदारी केली. पाटिदार २२ चेंडूंत २ षटकार मारून ३१ धावांवर माघारी परतला. एबीनं २०व्या षटकात २३ धावा कुटल्या. तो ४२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. RCBनं ५ बाद १७१ धावा केल्या. 4 / 10प्रत्युत्तरात दिल्लीला झटपट धक्के बसले. धावफलकावर २३ धावा असताना शिखर धवन ( ६) माघारी परतला अन् त्यानंतर स्टीव्ह स्मिथ ( ४) माघारी परतला. त्यामुळे दिल्लीला २८ धावांत दोन धक्के बसले होते. खेळपट्टीवर तग धरून बसलेला पृथ्वी शॉ ८व्या षटकात माघारी परतला. 5 / 10मार्कस स्टॉयनिस व रिषभ यांनी फटकेबाजी करताना DCचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ३४ चेंडूंत ४५ धावा जोडल्या, परंतु हर्षलनं १३व्या षटकात स्टॉयनिसला ( २२) माघारी पाठवले. शिमरोन हेटमायर व रिषभ यांनी पाचव्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ७८ धावांची नाबाद भागीदारी केली. 6 / 10शिमरोन २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला. रिषभ ४८ चेंडूंत ५८ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीनं १ धावेनं सामना गमावला. त्यांना ४ बाद १७० धावांवर समाधान मानावे लागले. 7 / 10अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ६ धावांची गरज असताना रिषभला चौकारावर समाधान मानावे लागेल. हाताशी आलेला सामना गमावल्यानंतर रिषभ प्रचंड निराश झाला, तर दुसरीकडे वादळी खेळी करणारा हेटमायर निशब्द झाला होता. या दोघांना सावरण्यासाठी विराट कोहली धावून आला अन् दोघांनाही दिलासा दिला. त्याच्या या खिलाडूवृत्तीनं सर्वांची मन जिंकली.8 / 109 / 1010 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications