Join us

IPL 2021 : या अनकॅप खेळाडूंनी गाजवला आयपीएलचा पहिला आठवडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 18:15 IST

Open in App
1 / 5

चार गुणांसह RCB टॉपवर आहेत. CSK, MI, DC, RR, PBKS, KKR या संघांच्या खात्यात प्रत्येकी एक विजयासह दोन गुण आहेत. SRHची पाटी पहिल्या आठवड्यात कोरी राहिली. पहिल्या आठवड्यांच्या सामन्यांमध्ये ग्लेन मॅक्सवेल हा एकमेव परदेशी खेळाडू मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार पटकावण्यात यशस्वी ठरला. त्याचसह अनकॅप खेळाडूंनी हा आठवडा गाजवला.

2 / 5

दीपक हुडा ( Deepak Hooda) : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्सच्या या खेळाडूनं २८ चेंडूंत ६४ धावांची खेळी केली. त्याच्या या फटकेबाजीनं पंजाब किंग्सनं दोनशेपार धावा कुटल्या.

3 / 5

हर्षल पटेल ( Harshal Patel) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या गोलंदाजानं गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड नोंदवला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध एका सामन्यात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. ३० वर्षीय गोलंदाजानं पहिल्याच सामन्यात २७ धावां ५ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या सामन्यात त्याला केवळ दोन विकेट्स घेता आल्या.

4 / 5

शाहबाज अहमद ( Shahbaz Ahmed) : RCB संघातील या २६ वर्षीय खेळाडूनं सनरायझर्स हैदराबादच्या तोंडचं पाणी पळवलं. त्यानं दोन षटकं फेकली आणि त्यात ७ धावा देत ३ महत्त्वाचे फलंदाज बाद करून RCBला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.

5 / 5

चेतन सकारिया ( Chetan Sakariya): सौराष्ट्रच्या या खेळाडूची स्टोरी खूप इमोशनल आहे. वडील टेम्पो चालवायच, जानेवारी महिन्यात लहान भावानं आत्महत्या केली. तेव्हा तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळत होता आणि घरच्यांनी दहा दिवस त्याच्यापासून ही गोष्ट लपवली होती. पंबाज किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं ३१ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या.

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्सराजस्थान रॉयल्स