Join us  

IPL 2021 Venues : मुंबईकर यंदा आयपीएलच्या सामन्यांना मुकणार; BCCIने निवडली पाच शहरं, फायनल अहमदाबादमध्ये?

By स्वदेश घाणेकर | Published: February 27, 2021 9:49 AM

Open in App
1 / 8

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली आणि आता स्पर्धा वेळापत्रकाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे गतवर्षी संपूर्ण आयपीएल यूएईत खेळवण्यात आली होती. मात्र, यंदा आयपीएल ( Indian Premier League) भारतातच खेळवण्याचा BCCIचा प्रयत्न आहे.

2 / 8

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत आणि त्यांनी पाच शहरांची नावं निश्चित केल्याचे वृत्त काही इंग्रजी वेबसाईट्सनी दिले आहेत. या वृत्तानुसार यंदा मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) त्यांच्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळता येणार नाही. त्यामुळे यंदा मुंबईकरांना आयपीएलच्या सामन्यांच्या आनंदाला मुकावे लागणार आहे.

3 / 8

IPL 2021 Venue, Dates and Schedule: आयपीएल २०२१ च्या वेळापत्रकावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयनं पुढील आठवड्यात बैठक बोलावली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या बैठकीत आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह उपस्थित राहणार आहेत.

4 / 8

सध्या तरी बीसीसीआयनं पाच शहरांची निवड करून यंदाची आयपीएल भारतातच होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली, तरच यूएईचा पर्याय वापरला जाईल. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाल यांनी सांगितले की,''कोरोना व्हायरसच्या परिस्थितीकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत.''

5 / 8

आयपीएल २०२१ ची सुरुवात ११ एप्रिलपासून होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, परंतु अजूनही बोर्डाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ८ मार्चला संपेल आणि त्यानंतर ती घोषणा होईल, असे धुमाल यांनी स्पष्ट केले.

6 / 8

आयपीएलचं वेळापत्रक किमान एक महिना आधी जाहीर करा अशी विनंती फ्रँचायझींनी बीसीसीआयकडे केली आहे. त्यामुळे ८ ते १० मार्च दरम्यान वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

7 / 8

BCCIनं शॉर्टलिस्ट केलेल्या पाच शहरांमध्ये चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बंगळुरू आणि दिल्ली ही नावं आहेत. राज्य सरकारकडून अजूनही BCCIला परवानगी न मिळाल्यानं मुंबईचा पर्यायावर अनिश्चिततेचं सावट आहे.

8 / 8

कोरोना व्हायरसची परिस्थिती लक्षात घेता यंदा आयपीएल नव्या स्वरूपात खेळवण्याचाही विचार सुरू आहे. CARAVAN style ने म्हणजेच खेळाडूंचा प्रवास टाळण्यासाठी यंदाच्या आयपीएलमध्ये संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल. त्यानुसार प्रत्येक गटातील संघांचे सामने एकाच शहरात खेळवण्यात येतील.

टॅग्स :आयपीएलआयपीएल २०२१ मिनी ऑक्शनचेन्नईअहमदाबादकोलकाता उत्तरदिल्लीमुंबई