Join us  

IPL 2021 : पोट भरण्यासाठी कधी काळी विकायचा पाणीपुरी, आयपीएलनं बनवलं करोडपती; जाणून घ्या 'यशस्वी' कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 7:42 PM

Open in App
1 / 7

१७व्या वर्षी त्यानं वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला. विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत त्यानं हा पराक्रम केला होता आणि आज तोच यशस्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रमुख सलामीवीर म्हणून खेळत आहे. राजस्थान रॉयल्सनं २.४ कोटी रुपये मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. यशस्वीच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे.

2 / 7

तीन वर्ष यशस्वी तंबूत राहिला, पाणीपुरी विकली... क्रिकेटपटू बनण्यासाठी त्यानं जे हाल सोसले, ते डोळ्यात पाणी आणणारे आहेत. पण, त्याचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. मुंबईच्या आझाद मैदान येथील मुस्लीम युनायटेड क्लबच्या तंबूत ग्राऊंड्समनसोबत यशस्वी तीन वर्ष राहिला. एका डेअरी शॉपमध्ये तो काम करायचा, परंतु क्रिकेट खेळून पार थकून जायचा. त्यामुळे काम करताना त्याला झोप यायची. त्यामुळे त्याला मालकानं कामावरून काढून टाकलं होतं.

3 / 7

फक्त एक यशस्वी क्रिकेटपटू बनायचंय हे एकच ध्येय उराशी बाळगून तो झटत राहिला. उत्तर प्रदेशातील भदोही गावातील हा युवा खेळाडू. त्याच्या वडिलांचं गावाकडं एक लहानस दुकान आहे. क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं मुंबई गाठली.

4 / 7

२०२०मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं १ शतक व ४ अर्धशतकांसह ४०० धावा केल्या होत्या. त्याला त्या स्पर्धेत मॅन ऑफ दी टूर्नामेंट म्हणून हा पुरस्कार मिळालं. विजय हजारे ट्रॉफीत त्यानं झारखंडविरुद्धच्या सामन्यात १५४ चेंडूंत २०३ धावांची वादळी खेळी केली.

5 / 7

मुंबईत तो त्याच्या काकांकडे रहायचा, पण घर छोटं असल्यानं सर्वांना तेथे राहणे अवघड जायचे. त्याच्या काकांनी मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांकडे यशस्वीला क्लबमध्ये रहायला देण्याची विनंती केली. त्यानंतर यशस्वी क्लबच्या तंबूत तीन वर्ष राहिला.

6 / 7

त्यानं हे त्याच्या घरच्यांना कधीच कळू दिले नाही. त्यांना कळले असते तर यशस्वीची क्रिकेट कारकिर्द तेथेच संपुष्टात आली असती. त्याचे वडील मुंबईला पैसे पाठवायचे, परंतु ते पुरेसे नव्हते. म्हणून यशस्वी आझाद मैदान येथील राम लीला येथे पाणीपूरी व फळ विक्री करायचा. अनेकदा तर त्याला रिकामी पोटी झोपावं लागलं आहे.

7 / 7

आझाद मैदानावर अनेकदा क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू हरवायचे आणि तो शोधून आणल्यावर त्याला काही पैसे मिळायचे. एकदा आझाद मैदानावर खेळत असताना यशस्वीवर कोच ज्वाला सिंह यांची नजर पडली. ज्वाला सिंह हेही उत्तर प्रदेशचे. त्यांनी यशस्वीला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि एक उत्तम क्रिकेटपटू बनवलं.

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्स
Open in App