Join us  

मोठी बातमी : MS Dhoni आयपीएल २०२२त खेळणार की नाही?; चेन्नई सुपर किंग्सची महत्त्वाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 1:17 PM

Open in App
1 / 10

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. IPL 2021चे उर्वरित सामने १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत यूएई येथे खेळवण्यात येणार आहेत. त्यात बीसीसीआयनं आयपीएल २०२२ची तयारी सुरू केली आहे.

2 / 10

आयपीएलच्या पुढील पर्वात दोन नवीन संघांचा समावेश करण्यात येणार असल्यामुळे मेगा ऑक्शन होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयनं नियमावली तयार केली असून प्रत्येक फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंनाच संघात कायम राखता येणार आहे.

3 / 10

त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) सह अन्य संघ कोणत्या चार प्रमुख खेळाडूंना कायम राखते याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यात आता पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

4 / 10

माहीचा सध्याचा फॉर्म पाहता तो आयपीएल २०२२ खेळण्याची शक्यता फार कमी आहे, असा अंदाज बांधला जात आहे. पण, याबाबत कोणीच ठाम सांगू शकत नाही. धोनी CSKच्या प्रशिक्षक किंवा मेंटॉरच्या भूमिकेतही दिसू शकतो, असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.

5 / 10

CSKनं २०२२मध्येही धोनी संघाचा सदस्य असेल असे आधीच जाहीर केले असले तरी तो नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसेल याबाबत संभ्रम आहे. आयपीएल २०२०त धोनीच्या नेतृत्वाखाली CSKला प्ले ऑफमध्येही प्रवेश करता आलेला नव्हता. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच CSKला हे अपयश आले. आयपीएल २०२१त मात्र CSKनं आतापर्यंत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.

6 / 10

बीसीसीआयच्या नियमानुसार आयपीएल २०२२ साठी चार खेळाडूंना कायम राखता येणार आहे. त्यात तीन भारतीय व एक परदेशी किंवा दोन भारतीय व दोन परदेशी असा पर्याय देण्यात आला आहे.

7 / 10

CSKच्या सध्याच्या संघातील खेळाडूंवर लक्ष टाकल्यास ३+१ फॉर्म्युल्यानुसार धोनी, सुरेश रैना, ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिस किंवा २+२ फॉर्म्युल्यानुसार धोनी व ऋतुराज आणि फॅफ व स‌ॅम कुरन/मोईन अली असे पर्याय समोर येत आहेत.

8 / 10

पण, या सर्व चर्चा आता थांबवणारे वृत्त समोर येत आहे. CSKचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी महेंद्रसिंग धोनी हा आणखी १ किंवा दोन वर्ष संघासोबत कायम राहणार आहे. तो पूर्णपणे तंदुरूस्त आहे, कसून सराव करतोय आणि त्यानं थाबण्याच काहीच कारण दिसत नाही, असे सांगितले.

9 / 10

ते पुढे म्हणाले, चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीनं जे काही केलं त्यासाठी आम्ही आनंदीच आहोत. हे फक्त त्याचे कर्णधारपदाबाबत नाही किंवा युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याबाबत नाही. तो अजूनही तंदुरूस्त आहे आणि आमच्यासाठी त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तो फिनिशर आहे आणि आमच्यासाठीही तो त्याच भूमिकेत असेल.

10 / 10

धोनीनं २०२१ च्या ७ सामन्यांत ३७ धावा केल्या आहेत. एकूण २११ आयपीएल सामन्यांत त्यानं ४०.२५च्या सरासरीनं ४६६९ धावा केल्या आहेत. त्यानं ११८ झेल व ३९ स्टम्पिंग्सही केल्या आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२१