IPL 2022, CSK Vs PBKS : चेन्नई सुपरकिंग्सच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर Suresh Raina ट्रेंडिंगमध्ये, होतेय अशी मागणी

Suresh Raina News: चेन्नई सुपरकिंग्ससाठी आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. गतविजेत्या चेन्नईच्या संघाला आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर आता चेन्नई सुपरकिंग्सचा माजी खेळाडू सुरेश रैना चर्चेत आला आहे.

चेन्नई सुपरकिंग्ससाठी आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. गतविजेत्या चेन्नईच्या संघाला आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर आता चेन्नई सुपरकिंग्सचा माजी खेळाडू सुरेश रैना चर्चेत आला आहे.

चेन्नई सुपरकिंग्सच्या खराब कामगिरीनंतर रवींद्र जडेजाच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी धोनीने संघाचं नेतृत्व जडेजाकडे सोपवलं होतं. दरम्यान, आता पुन्हा एकदा सुरेश रैनाला संघात परत बोलावण्याची मागणी होत आहे.

आयपीएल २०२२ च्या मेगाऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने सुरेश रैनाला संघातून मुक्त केले होते. तर लिलावामध्ये सीएसकेसह कुठल्याही फ्रँचायझीने रैनासाठी उत्सुकता दाखवली नव्हती. त्यामुळे लिलावात सुरेश रैना अनसोल्ड राहिला होता.

२००८ मध्ये आयपीएललला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच सुरेश रैनाला आयपीएलमध्ये कुणी खरेदीदार भेटला नाही. मात्र सुरेश रैना सध्या आयपीएल २०२२मध्ये समालोचक म्हणून काम करत आहे.

दरम्यान, चेन्नईच्या तिसऱ्या पराभवानंतर सोशल मीडियावर सुरेश रैनाचं नाव ट्रेंडिंगमध्ये आहे. सुरेश रैनाला फलंदाजीसाठी नाही, तर सीएसकेचा लकी चार्म म्हणून फ्रँचायझीने बेस प्राईसवर खरेदी केलं पाहिजे, असा सल्ला फॅन्सकडून देण्यात येत आहे.

सीएसकेच्या तिसऱ्या पराभवानंतर फॅन्सनी सांगितले आहे की, सुरेश रैनाच्या नावाचा पुन्हा विचार करण्यासाठी मिळालेला हा तिसरा इशारा आहे.