Join us  

IPL 2022: सलग आठ पराभव, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडणार? या खेळाडूंनाही मध्येच सोडावं लागलं होतं नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 3:11 PM

Open in App
1 / 10

आयपीएलमध्ये सर्वाधिक विजेतेपदे पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची या हंगामातील कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. मुंबईला आतापर्यंत खेळलेल्या आठही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्याने कर्णधारपद सोडल्यास हंगामाच्या मध्येच नेतृत्व सोडणाऱ्या काही दिग्गज कर्णधारांच्या यादीत त्याचा समावेश होईल. या कर्णधारांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

2 / 10

२००९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार केविन पीटरसनकडून हंगामाच्या मध्यावरच संघाचं नेतृत्व काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर अनिल कुंबळेकडे कप्तानी सोपवण्यात आली. कुंबळेने आरसीबीला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते. मात्र अंतिम सामन्यात त्यांना डेक्कन चार्जर्सकडून पराभव पत्करावा लागला होता.

3 / 10

२०१२ मध्ये डेक्कन चार्जर्सने हंगामाच्या मध्यावरच कुमार संगकाराकडून कर्णधारपद काढून घेतले होते. तसेच कॅमरॉन व्हाईटला कर्णधार बनवले होते. डेक्कन चार्जर्स आता आयपीएलमध्ये नाही आहे.

4 / 10

२०१२ च्या आयपीएलमध्ये डॅनियल व्हेटोरीकडून संघाचं नेतृत्व काढून घेत आरसीबीने विराट कोहलीला आपला कर्णधार बनवले होते. त्या हंगामात आरसीबीचा संघ पाचव्या स्थानी राहिला.

5 / 10

मुंबई इंडियन्सने २०१३ च्या आयपीएलमध्ये हंगामाच्या मध्यावर रिकी पाँटिंगकडून कर्णधारपद काढून घेत रोहित शर्माला कर्णधार केले होते. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

6 / 10

२०१३ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने अॅडम गिलक्रिस्टला हंगामाच्या मध्येच संघाच्या कर्णधारपदावरून हटवले होते. त्यानंतर डेव्हिड हसीला कर्णधार बनवण्यात आले.

7 / 10

कोलकाताला दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरला दिल्लीने २०१८ मध्ये कर्णधारपदी नियुक्त केले होते. मात्र समाधानकारक कामगिरी न झाल्याने गंभीरने हंगामाच्या मध्यावरच कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर श्रेयस अय्यरला दिल्लीचा कर्णधार बनवण्यात आले.

8 / 10

२०१९ च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने हंगामाच्या मध्यावरच अजिंक्य रहाणेच्या जागी स्टिव्ह स्मिथला कर्णधारपद केले. मात्र तरीही राजस्थानची कामगिरी निराशाजनक झाली. अखेरीस संघ गुणतक्त्यात सातव्या स्थानी राहिला.

9 / 10

आयपीएलच्या या हंगामात दिनेश कार्तिक धमाकेदार कामगिरी करत आहे. मात्र २०२० च्या आयपीएलमध्ये खराब कामगिरीनंतर त्याने कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर इऑन मॉर्गनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

10 / 10

आयपीएल २०२१च्या मध्यावरच सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवले होते. त्याच्या जागी केन विल्यम्सनला कर्णधार करण्यात आले. मात्र हा निर्णय म्हणावा तसा फायदेशीर ठरला नव्हता.

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्स
Open in App