IPL 2022: सुरुवातीलाच अडखळलेल्या चेन्नईला खुशखबर, या सामन्यामधून संघात पुनरागमन करणार दीपक चहर

IPL 2022 Updates: गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सची आयपीएलच्या या हंगामात चांगली सुरुवात होऊ शकलेली नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला आहे.

गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सची आयपीएलच्या या हंगामात चांगली सुरुवात होऊ शकलेली नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला आहे.

नवा कर्णधार रवींद्र जडेजा आतापर्यंत काहीही प्रभाव पाडू शकलेला नाही. दोन सामन्यात त्याला एकही बळी मिळालेला नाही. लखनौविरुद्धच्या लढतीत तर चेन्नईला २१० अशी मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान, वेगवान गोलंदाज दीपक चहर अद्यापही दुखापतग्रस्त आहे. तसेच आयपीएलमधून बाहेर आहे. तो सध्या एनसीएमध्ये असून, चेन्नईसाठी दिलासादायक बाब म्हणजे तो पुढच्या दोन आठवड्यांमध्ये संघात दाखल होऊ शकतो. एवढेच नाही तर तो २५ एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरोधात मैदानात उतरू शकतो.

चेन्नईची संघ दुसऱ्या सामन्यात मुकेश चौधरी आणि तुषाद देशपांडे यांच्यासह उतरली होती. दरम्यान, पंजाबविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात ख्रिस जॉर्डन संघात पुनरागमन करू शकतो.

दरम्यान, दीपक चहरने २५ एप्रिल रोजी संघात पुनरागमन केलं तर अखेरच्या सात सामन्यांमध्ये त्याला संघाकडून खेळता येणार आहे. गेल्या आयपीएलमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला १४ कोटी रुपये मोजून संघात घेण्यात आले होते.