Join us  

Hardik Pandya IPL 2022, GT vs RCB Live Updates : हार्दिक पांड्याचा एक इशारा Umpire ने बदलला फैसला; RCBच्या फलंदाजाबाबत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 5:51 PM

Open in App
1 / 8

IPL 2022, Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्याची सुरुवात व शेवट हा नाट्यमय घडामोडींनीच झाला. पण, आजच्या सामन्यात विराट कोहलीचा ( Virat Kohli) परतलेला फॉर्म हा चाहत्यांसाठी सुखावणारा ठरला. रजत पाटीदारनेही अर्धशतकी खेळी केली, परंतु २०व्या षटकात हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) कृती चर्चेची ठरली.

2 / 8

मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात रन अप चुकत असल्याने मेजर टेप मागवली आणि २०व्या षटकात RCBचा फलंदाज महिपाल लोम्रोर ( Mahipal Lomror) याच्यासोबत एक प्रसंग घडला. GT चा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याच्या एका इशाऱ्यावर हे सर्व घडलं आणि मैदानावरील अम्पायरला निर्णय बदलावा लागला.

3 / 8

पहिल्या षटकात शमीने पहिला चेंडू टाकला आणि त्यानंतर पुढील दोन चेंडू टाकता टाकता तो क्रीजवर येऊन थांबला. त्याने मेजर टेप मागवून पुन्हा रन अपचे माप घेतले आणि त्याच्या या कृतीवर अम्पायर नाराज झाले. दुसऱ्या षटकात फॅफ ड्यू प्लेसिस ( ०) बाद झाला. २०१८नंतर पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या प्रदीप सांगवानने दुसऱ्या षटकात RCBला हा धक्का दिला.

4 / 8

रजत पाटीदार व विराट यांनी दमदार खेळी सुरूच ठेवली. विराट व पाटीदार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ चेंडूंत ९९ धावांची भागीदारी केली. प्रदीप सांगवानने ही भागीदारी तोडली आणि पाटीदार ३२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला.

5 / 8

विराटच्या अर्धशतकानंतर शमी त्याच्या कानाजवळ येऊन काहीतरी पुटपूटला होता अन् त्यानंतर पुढील षटकात शमीने त्याला बाद केले. विराट ५३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५८ धावांवर बाद झाला. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात दिनेश कार्तिक ( २) राशिद खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. RCB ने ६ बाद १७० धावांचा डोंगर उभा केला.

6 / 8

ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३३ धावा चोपल्या,तर महिपाल लोम्रोरने ८ चेंडूंत १६ धावा केल्या. RCB ने ६ बाद १७० धावांचा डोंगर उभा केला.

7 / 8

या सामन्याच्या अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर महिपालने टोलावलेला उत्तुंग चेंडू डेव्हिड मिलरने सुरेखरित्या टिपला. अम्पायरने महिपालला नाबाद दिले, परंतु तो चेंडू हवेत असलेल्या वायरवर आदळल्याचा दावा महिपालने केला. हार्दिकनेही चेंडू वायरला आदळला आहे, महिपालला खेळू द्या असा इशारा केला.

8 / 8

रिप्लेत हे स्पष्ट झाले आणि अम्पायरने निर्णय बदलताना तो चेंडू डेड बॉल म्हणून जाहीर केला. हार्दिकच्या या खिलाडूवृत्तीचं आता कौतुक होताना दिसतंय.

टॅग्स :आयपीएल २०२२हार्दिक पांड्यागुजरात टायटन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App