When MS Dhoni decided to quit CSK Captaincy?; एन श्रीनिवासन यांच्यासोबत १० मिनिटांचा कॉल अन् महेंद्रसिंग धोनीने सोडले CSKचे कर्णधारपद; Inside Story!

When MS Dhoni decided to quit CSK Captaincy?; चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता माजी झाला. पण, धोनीनं हा निर्णय कधी व कसा घेतला जाणून घेऊया Inside Story...

When MS Dhoni decided to quit CSK Captaincy?; चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता माजी झाला. इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला ( IPL 2022) सुरुवात होण्याच्या बरोबर दोन दिवस आधी MS Dhoni ने कर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeaja) खांद्यावर सोपवली अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण, धोनीनं हा निर्णय कधी व कसा घेतला जाणून घेऊया Inside Story...

चेन्नई सुपर किंग्सने गुरुवारी दुपारी २.३५ मिनिटांनी केलेल्या ट्विटने सर्व खडबडून जागे झाले. महेंद्रसिंग धोनीनं CSKचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे ते ट्विट होते. २०१२ पासून जडेजा CSKचा सदस्य आहे आणि CSK चे नेतृत्व सांभाळणारा तो तिसरा खेळाडू असणार आहे. धोनी यंदाच्या पर्वात आणि यापुढेही CSKकडून खेळणार असल्याचेही त्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

२६ मार्चला CSK आयपीएल २०२२ मधील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे आणि त्याआधी घेतलेला हा निर्णय CSK च्या फॅन्सना मोठा धक्का देणारा आहे. धोनीने २०२० मध्ये ट्विट करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, परंतु CSKचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय हा त्याने एकाऐकी घेतलेला नाही. यावेळी त्याने विराट कोहली मेथड वापरली.

महेंद्रसिंग धोनीनं चेन्नई सुपर किंग्ससाठी २०४ सामन्यांत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आणि त्यात १२१ विजय मिळवले, तर ८२ सामन्यांत हार मानावी लागली. त्याच्या विजयाची सरासरी ही ५९.६०% आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने २०१०, २०११, २०१८ व २०२१ मध्ये आयपीएल जेतेपदं पटकावली. याशिवाय त्यांनी ९ वेळा आयपीएल फायनल गाठली. CSK च्या नावावर २ चॅम्पियन्स लीगचे जेतेपदंही आहेत.

चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, कर्णधारपद सोडण्याचा निर्णय धोनीच्या मनात आधीपासूनच सुरू होता आणि तो योग्य वेळेची वाट पाहत होता. आजच्या सराव सत्रानंतर झालेल्या संघाच्या मिटींगमध्ये त्याने हा निर्णय कळवला. रवींद्र जडेजा CSK चे कर्णधारपद यशस्वीरित्या सांभाळू शकतो, असे धोनीला वाटत होते आणि त्याचा फॉर्मही चांगला सुरू आहे.

गुरुवारी सकाळी महेंद्रसिंग धोनीने त्याचा निर्णय CEO विश्वनाथन यांना कळवला. तो सर्वांसाठी मोठा धक्का होता. त्यावेळी त्याने CSK चे मालक एन श्रीनिवासन यांच्याशी बोलायचे आहे, असे सांगितले.

सकाळी १०च्या सुमारास विश्वनाथन यांनी श्रीनिवासन यांच्या ऑफिसमध्ये कॉल केला आणि धोनीचं बोलणं करून देण्याची विनंती केली.

दुपारी श्रीनिवासन यांच्या ऑफिसमधून धोनीसाठी कॉल आला आणि धोनीनं त्याचा निर्णय मालकांना सांगितला. श्रीनिवासन यांनी हा निर्णय मागे घेण्यास सांगितले, परंतु कॉल संपेपर्यंत धोनीनं या निर्णय योग्य असल्याचे त्यांना पटवून दिले. १० मिनिटांच्या कॉलनंतर धोनीनं हा निर्णय संघाच्या मिटिंगमध्ये जाहीर केला.