Join us  

KL Rahul, IPL 2022 : केएल राहुलच्या Lucknow Super Giants संघाला मोठा धक्का; भरवशाच्या खेळाडूने घेतली स्पर्धेतून माघार, पाहा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 3:40 PM

Open in App
1 / 6

KL Rahul, IPL 2022: इतके वर्षे Mumbai Indians कडून खेळलेला Hardik Pandya आता Gujarat Titans संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर Punjab Kings चा कर्णधार लोकेश राहुल आता नवा संघ Lucknow Super Giants चे नेतृत्व करणार आहे.

2 / 6

गुजरातच्या संघाला स्पर्धेच्या आधीच मोठा धक्का बसला होता. जेसन रॉयने (Jason Roy) संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर आता राहुलच्या संघाचाही भरवशाचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या मार्क वूडनेही (Mark Wood) स्पर्धेतून माघार घेतली आहे.

3 / 6

IPL सुरू होण्यासाठी अवघा थोडाच अवधी शिल्लक आहे. त्यातच लखनौ सुपरजायंट्सला मोठा धक्का बसला आहे. लखनौने आपला एक अष्टपैलू खेळाडू स्पर्धेआधीच गमावला आहे. मार्क वूड दुखापतीमुळे IPL मध्ये खेळू शकणार नाही.

4 / 6

वेस्ट इंडिजविरुद्धच्या अँटिग्वा कसोटीत मार्क वूडच्या कोपराला दुखापत झाली. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याला गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीतही संधी देण्यात आली नाही. आणि आता तो IPL 2022 लादेखील मुकणार आहे.

5 / 6

मार्क वूड हा लखनऊ सुपरजायंट्सच्या महत्त्वाचा खेळाडू होता. याच कारणामुळे लखनौने या वेगवान गोलंदाजाला ७.५ कोटींना खरेदी केले होते. पण आता लखनौ सुपरजायंट्सला मोठा झटका बसला आहे.

6 / 6

मार्क वुडची दुखापत जोफ्रा आर्चरसारखीच असल्याचे सांगण्यात येत आहे. जोफ्रा आर्चर गेल्या एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्याही कोपराला सूज आली होती. मार्क वुडची दुखापतही तशीच असेल तर त्याला टी२० विश्वचषकालाही मुकावे लागू शकते.

टॅग्स :आयपीएल २०२२लोकेश राहुललखनौ सुपर जायंट्सआयपीएल लिलाव
Open in App