Rahul Chahar : Mumbai Indians चा माजी खेळाडू २२ व्या वर्षी करणार फॅशन डिझायनरशी लग्न; IPL 2022 पूर्वी गोव्यात पार पडणार सोहळा!

भारतीय संघाचा व पंजाब किंग्सचा फिरकीपटू राहुल चहर ( Rahul Chahar) IPL 2022 पूर्वी लग्न बंधनात अडकणार आहे.

भारतीय संघाचा व पंजाब किंग्सचा फिरकीपटू राहुल चहर ( Rahul Chahar) IPL 2022 पूर्वी लग्न बंधनात अडकणार आहे. चहरची होणारी पत्नी इशानी ही फॅशन डिझायनर आहे. २०१९मध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता आणि आता १२ मार्चला ते गोव्यात लग्न करणार आहेत.

राहुल चहर हा मुंबई इंडियन्सचा माजी सदस्य आहे आणि चेन्नई सुपर किंग्स व भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर याचा भाऊ आहे. आग्रा येथील घरात राहुलच्या लग्नाचा रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे आणि त्यावेळेस काही भारतीय खेळाडू तेथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राहुलनं ५ नोव्हेंबर २०१६मध्ये राजस्थान संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढच्याच वर्षी त्यानं लिस्ट ए सामनाही खेळला

विजय हजारे चषक स्पर्धेत 2018-19 च्या मोमसात राजस्थान संघाकडून सर्वाधिक 20 विकेट्स घेण्याचा पराक्रम त्यानं केला.

२०१७मध्ये त्याला इंडियन प्रीमिअर लीगमधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघानं 10 लाखांत आपल्या ताफ्यात घेतले.२०१७मध्ये त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले.

त्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला १.९ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. आयपीएलच्या ४२ सामन्यांत त्याच्या नावावर ४३ विकेट्स आहेता. आयपीएल २०२१मध्ये त्याने ११ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या होत्या.

आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने त्याच्यासाठी ५.२५ कोटी रुपये मोजले.

२२ वर्षीय राहुलने भारताकडून ६ ट्वेंटी-२०सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या आहेत. २०२१मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वन डे सामन्यातून त्याने पदार्पण केले होते आणि त्या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या.