Join us  

CSK plan for IPL 2022 Mega Auc tion : मोठी बातमी; महेंद्रसिंग धोनीनं स्ट्रॅटेजी ठरवली, CSK मेगा ऑक्शनमध्ये 'तीन' महत्त्वाच्या खेळाडूंवर लावणार बोली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 1:37 PM

Open in App
1 / 6

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी येत्या शनिवार-रविवारी बंगळुरू येथे Mega Auction होणार आहे. त्यासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) चेन्नईत दाखल झाला आहे आणि त्यानं चेन्नई सुपर किंग्ससाठी ( CSK) रणनीती तयार केली आहे.

2 / 6

BCCIच्या नियमानुसार आयपीएलमधील ८ फ्रँचायझींना प्रत्येकी ४ खेळाडूंना रिटेन करायचे होते, तर अहमदाबाद व लखनौ या नव्याने दाखल झालेल्या संघांना प्रत्येकी ३ खेळाडूंना करारबद्ध करायचे होते. त्यामुळे अनेक संघांना इच्छा नसतानाही काही महत्वाच्या खेळाडूंना रिलीज करावे लागले.

3 / 6

चेन्नई सुपर किंग्सने ड्वेन ब्राव्हो, फॅफ ड्यू प्लेसिस या मॅचविनर खेळाडूंसह दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर या युवा खेळाडूंना रिलीज केले. CSK ने कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा व मोईन अली यांना कायम राखण्याचा निर्णय घेतला.

4 / 6

आयपीएल ऑक्शनसाठी ( IPL 2022 Mega Auction) रणनीती ठरवण्यास धोनी चेन्नईत दाखल झाला आहे. त्याने संघ व्यवस्थापनासोबत बसून तीन खेळाडूंची नावं निश्चित केली आहेत आणि त्यांच्यासाठी CSKला पैसा ओतण्यास सांगितला आहे.

5 / 6

चेन्नई सुपर किंग्सच्या सूत्रांनी थेट त्या खेळाडूंची नावं सांगितली नसली तरी त्यांनी संकेत दिले आहेत. ते म्हणाले,''ऑक्शन स्ट्रॅटेजी सांगणे योग्य नाही, परंतु CSKच्या यशात इतकी वर्ष योगदान देणार्या खेळाडूंना पुन्हा संघात पाहू शकता. मी त्यांनी नावं सांगणार नाही. CSKनं इतकी वर्ष संघबांधणी केली आणि रिटेशन नियमामुळे आम्हाला त्या खेळाडूंना जाऊ द्यावे लागले.''

6 / 6

सूत्रांच्या माहितीनुसार चेन्नई सुपर किंग्स फॅफ ड्यू प्लेसिस, शार्दूल ठाकूर आणि दीपक चहर यांना पुन्हा ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. चेन्नईच्या खात्यात ४२ कोटी शिल्लक आहेत आणि त्यांना २१ खेळाडू खरेदी करायचे आहेत.

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी
Open in App