मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२२मधील विजयाची पाटी कोरीच राहिली. अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला. १९ वर्षीय तिलक वर्मा ( Tilak Varma) व गोलंदाज डॅनिएल सॅम्स ( Daniel Sams) यांनी मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले होते. पण, महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अखेरच्या चार चेंडूवर सामना फिरवला. ४ चेंडूंत १६ धावांची गरज असताना धोनीने ६, ४, २, ४ अशी फटकेबाजी करून चेन्नईला ३ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.