KL Rahul IPL 2022, MI vs LSG Live Updates : लोकेश राहुलने आज कमाल केली; Rohit Sharma, Virat Kohli यांच्या विक्रमांशी बरोबरी तर मोडला सुरेश रैनाचा विक्रम

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सच्या ६ बाद १६८ धावांमध्ये लोकेश राहुलच्या ( KL Rahul) ६२ चेंडूंत नाबाद १०३ धावा होत्या, तर अन्य फलंदाजांनी ५७ धावा केल्या. लोकेशने आजच्या खेळीने अनेक विक्रम मोडले.

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : लोकेश राहुलने ( KL Rahul) शतकी खेळी करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा एकट्याने सामना केला. लखनौ सुपर जायंट्सच्या ६ बाद १६८ धावांमध्ये लोकेशच्या ६२ चेंडूंत नाबाद १०३ धावा होत्या, तर अन्य फलंदाजांनी ५७ धावा केल्या. लोकेशने आजच्या खेळीने अनेक विक्रम मोडले.

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने यजमान MI ला तोडीसतोड उत्तर दिले. लोकेश राहुलने MI च्या गोलंदाजांची पुन्हा धुलाई करताना यंदाच्या पर्वातील दुसरे शतक झळकावले. आयपीएलमधील त्याचे हे चौथे, तर मुंबईविरुद्धचे तिसरे शतक ठरले. या कामगिरीसह त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली.

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक १० धावांवर बाद झाला. लोकेश राहुलने मनीष पांडेसह ( २२) दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. लोकेशने ३७ चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले. मुंबई इंडियन्सविरुद्ध लोकेशची ही ८ वी 50+ धावांची खेळी ठरली आणि त्याने सुरेश रैनाचा ( ७) विक्रम मोडला. लोकेशने मुंबई इंडियन्सविरुद्ध ८०च्या सरासरीने ८००+ धावा पूर्ण केल्या.

मार्कस स्टॉयनिस भोपळ्यावर बाद झाला. कृणाल पांड्या ( १), दीपक हुडा ( १०) व आयुष बदोनी ( १४) हेही फार काही करू शकले नाही. मुंबईकडून रिले मेरेडिथ व किरॉन पोलार्ड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. डॅनिएल सॅम्स व जसप्रीत बुमराह यांना एक विकेट मिळाली.

लोकेशने ६१ व्या चेंडूवर षटकार खेचून शतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध तीन शतक झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. त्याने २०१९ मध्ये वानखेडेवर ६४ चेंडूंत नाबाद १००, यंदा ब्रेबॉर्नपाठोपाठ ( १०३*) वानखेडेवर शतक झळकावले.

लोकेश ६२ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह १०३ धावांवर नाबाद राहिला. लखनौने ६ बाद १६८ धावांचा डोंगर उभा केला. मुंबई इंडियन्सविरुद्ध मागील ९ डावांमध्ये लोकेशने 94 (60), 71* (57), 100* (64), 17 (19), 77 (51), 60* (52), 21 (22), 103* (60) व 103* (62) अशा धावा केल्या.

२०१६मध्ये साखळी फेरीत विराट कोहलीने गुजरात लायन्सविरुद्ध दोन शतकं झळकावली होती. त्याने 100*(63) व 109(55) धावा केल्या होत्या. त्यानंतर साखळी फेरीत एकाच संघाविरुद्ध शतक झळकावणारा लोकेश हा दुसरा फलंदाज ठरला. त्याने आयपीएल २०२२ मध्ये मुंबईविरुद्ध 103*(60) व 103*(62) धावा केल्या.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या भारतीय फलंदाजांत लोकेशने ४ शतकांसह ( ९३ डाव) दुसरे स्थान पटकावले, विराट कोहील ५ शतकांसह ( २०७ डाव) अव्वल स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध लोकेशची सरासरी ही ८६.७ इतकी आहे आणि आयपीएल इतिहासातील एकाच प्रतिस्पर्धीविरुद्धची सर्वोत्तम सरासरी आहे.

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ६ शतकांच्या रोहित शर्माच्या विक्रमाशी लोकेशने आज बरोबरी केली.