Rohit Sharma MI vs PBKS : Mumbai Indians चं माहीत नाही, पण रोहित शर्मा आज दोन मोठे विक्रम नोंदवणार; विराटनंतर त्याचेच नाणे खणखणणार

इंडियन प्रीमिअर लीगची सर्वाधिक ५ जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला १५व्या पर्वात सलग चार पराभव पत्करावे लागले आहेत. ते आता गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहेत आणि आज त्यांचा मुकाबला पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे.

मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखालील PBKS संघ ४ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात Mumbai Indians चा निकाल काय लागतो हे नंतर ठरेलच, परंतु कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला दोन मोठे विक्रम खुणावत आहेत.

या सामन्यात रोहित शर्माने २५ धावा करताच ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये तो १० हजार धावांचा टप्पा ओलांडेल. असा पराक्रम करणारा तो सातवा फलंदा ठरेल, तर विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

याशिवाय रोहितने या सामन्यात १ चौकार मारताच आयपीएलमध्ये ५०० चौकार तो पूर्ण करेल आणि मुंबई इंडियन्ससाठी २०० षटकार पूर्ण करण्यासाठी त्याला आज चारवेळा चेंडू सीमापार पाठवावा लागेल.

रोहितने ३७४ ट्वेंटी-२० सामन्यांत ९९७५ धावा केल्या आहेत. यात ६ शतकं व ६९ अर्धशतकांचा समावेश आहे.