IPL 2022, First Choice 4 Overseas Players : Mumbai Indiansच्या Playing XI मध्ये या चार परदेशी खेळाडूंना मिळू शकतं स्थान

मुंबईच्या संघात सध्या २५ पैकी आठ खेळाडू परदेशी आहेत.

IPL 2022 Mumbai Indians First Choice 4 Overseas Players : मुंबई इंडियन्सच्या संघाने IPL 2022 साठी कर्णधार Rohit Sharma सह चार महत्त्वाचे खेळाडू रिटेन केले होते. रोहित, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्ड या चार खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईने IPL Mega Auction 2022 मध्ये २१ खेळाडूंना विकत घेतले.

मुंबईच्या संघाकडे आता २५ पैकी ८ खेळाडू हे परदेशी आहे. या खेळाडूंपैकी केवळ चार खेळाडूच एका वेळी संघात खेळवता येऊ शकतात. त्यामुळे मुंबईच्या Playing XI मध्ये कोणत्या चार खेळाडूंना सर्वाधिक पसंती मिळू शकेल, ते आपण पाहूया.

किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) - पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या संघाकडून २०१० पासून खेळतोय. त्याने मुंबईकडून १७८ सामन्यात ३ हजार २६८ धावा केल्या आहेत. त्यात १६ अर्धशतकांचा समावेश असून २१६ षटकार लगावले आहेत. हार्दिकच्या अनुपस्थितीत पोलार्डचा अनुभव मुंबईच्या कामी येऊ शकतो.

टीम डेव्हिड (Tim David) - या खेळाडूला मुंबईने ८.२५ कोटींना संघात दाखल करून घेतलं आहे. टीम डेव्हिड हा हार्दिकचा पर्याय म्हणून संघात फिट बसतो. तो ६ फूट ५ इंच धिप्पाड खेळाडू असून त्याने विविध टी२० लीग स्पर्धा गाजवल्या आहेत. RCB कडून तो IPL 2021 मध्ये केवळ एक सामना खेळला.

टायमल मिल्स (Tymal Mills) - २०१७ नंतर पहिल्यांदाच टायमल मिल्स IPL मध्ये परतणार आहे. त्याने RCB कडून पाच सामन्यात पाच गडी घेतले होते. मुंबईने त्याला दीड कोटींना विकत घेतलं. त्याने आतापर्यंत इंग्लंडकडून १२ टी२० खेळल्या आहेत. बुमराहच्या साथीने वेगवान गोलंदाजीची सुरूवात करण्यासाठी मिल्सचा संघात उपयोग होऊ शकतो.

फॅबियन अँलन (Fabian Allen) - वेस्ट इंडिजचा अष्टपैलू फॅबियन अँलन याला मुंबईने ७५ लाखाला विकत घेतलं आहे. डावखुरा फिरकीपटू म्हणून तो कृणाल पांड्याची जागा घेऊ शकतो. तसेच त्याला फटकेबाजीही करता येते. त्यामुळे संघाची बांधणी करताना सर्व गोष्टींचा विचार करून फॅबियन अँलनला संघात घेण्याचा विचार मुंबईकडून केला जाऊ शकतो.