Join us  

IPL 2022 Playoffs Scenarios: सनरायझर्स हैदराबादने पुन्हा गणित बिघडवलं; दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, पंजाब यांना 'गॅस'वर बसवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:03 AM

Open in App
1 / 11

१९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी धडाकेबाज सुरूवात करून दिली. पण, उम्रान मलिकने ( Umran Malik) त्यांची दाणादाण उडवली. टीम डेव्हिडने ( Tim David) १८ चेंडूंत ४६ धावा कुटून मुंबईला सामना आणून दिला. पण, त्याची विकेट पडली अन् भुवनेश्वर कुमारने १९वे षटक निर्धाव फेकून मॅच फिरवली.

2 / 11

प्रियाम गर्ग ( ४२), राहुल त्रिपाठी ( ७६) आणि निकोलस पूरन (३८) यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली. डॅनिएल सॅम्स ( १-३९) व रिले मेरेडिथ ( १-४४) यांची चार षटकं महागडी ठरली. रमणदीप सिंगने ३ षटकांत २० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. हैदराबादने ६ बाद १९३ धावा केल्या.

3 / 11

१९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी दमदार सुरुवात करताना पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. रोहित ३६ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४८ धावांवर झेलबाद झाला. पुढच्या षटकात उम्रान मलिकने MIचा दुसरा ओपनर इशान किशन याला माघारी पाठवले. इशानने ४३ धावा केल्या.

4 / 11

दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर मुंबईवर थोडे दडपण आले. डॅनिएल सॅम्सने उत्तुंग फटके मारून ते कमी करण्याचे प्रयत्न केले. पण, उम्रान मलिक त्यांच्यासमोर मोठा अडथळा बनून उभा राहिला. १५व्या षटकात उम्रानने MIला आणखी एक धक्का देताना तिलक वर्माला ( ८) झेलबाद केले. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर प्रियाम गर्गने अप्रतिम झेल टिपला आणि डॅनिएल सॅम्स १५ धावांवर माघारी परतला.

5 / 11

कर्णधार केन विलियम्सनने संघातील अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला गोलंदाजीला आणले आणि त्याने आणखी एक विकेट मिळवून दिली. टीम डेव्हिडने भुवीच्या यॉर्करवर सरळ फटका मारला, परंतु तोपर्यंत नॉन स्ट्रायकर त्रिस्तान स्तुब्ब्स पुढे आला होता. भुवीचा हात लागून चेंडू यष्टींवर आदळला आणि स्तुब्ब्स दुर्दैवीरित्या रन आऊट झाला.

6 / 11

टी नटराजनने आज दिशाहीन गोलंदाजी केली आणि टीम डेव्हिडने त्याचा फायदा उचलला. १८ चेंडूंत ४५ धावांची गरज असताना टीम डेव्हिड दमदार खेळला. १८व्या षटकात त्याने चार षटकार खेचून २४ धावा कुटल्या. अखेरच्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात नटराजनने त्याला रन आऊट केले. डेव्हिड १८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावांवर माघारी परतला.

7 / 11

मुंबईला १२ चेंडूंत १९ धावा करायच्या होत्या. भुवीने १९व्या षटकात संजय यादवला बाद केले. भुवीने १९वे षटक निर्धाव फेकले आणि मुंबईला ६ चेंडूंत १९ धावांचे आव्हान ठेवले. फझलहक फारूकीने १५ धावा दिल्या. मुंबईला ७ बाद १९० धावा करता आल्याने हैदराबादने ३ धावांनी बाजी मारली.

8 / 11

या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादच्या खात्यात १३ सामन्यांत १२ गुण झाले आहेत. पंजाब किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्याही खात्यात १२ गुण झाले आहेत. आता दोन संघांचे १६ गुण, दोघांचे १४ व तिघांचे १२ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

9 / 11

कोलकाताचा अखेरचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी ( १६ गुण) आहे. त्यांना तो जिंकून खात्यातील गुणसंख्या १४ करता येणार आहे. पण, हा सामना गमावल्यास ते शर्यतीतून बाद होतील. RCBची अखेरची मॅच ही टेबल टॉपर गुजरात टायटन्ससोबत आहे. RCBने हा सामना जिंकला तर त्यांचे १६ गुण होतील, परंतु त्यांना मुंबई इंडियन्सकडून DCच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

10 / 11

दिल्लीने अखेरचा सामना जिंकल्यास त्यांचेही १६ गुण होतील आणि जर राजस्थान रॉयल्सने अखेरच्या साखळी सामन्यात ( वि. CSK) मात खाल्लास तीन संघ १६ गुणांसह शर्यतीत राहतील आणि अशात नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल. RRचा नेट रन रेट RCB व DC पेक्षा चांगलाच आहे.

11 / 11

पंजाब आणि हैदराबाद यांच्यात अखेरचा साखळी सामना आहे. पण, तोपर्यंत चार संघ निश्चित झाले नसतील तर या सामन्याला महत्त्व राहिल. अन्यथा हा औपचारिक सामना ठरेल.

टॅग्स :आयपीएल २०२२सनरायझर्स हैदराबादमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App