Join us  

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर कसे आहे IPL 2022 Points Table?; Mumbai Indiansसह ३ संघांची पाटी कोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 12:01 AM

Open in App
1 / 9

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( RR) ४ विकेट्स व ५ चेंडू राखून विजय मिळवला.

2 / 9

५ बाद ८७ अशा धावसंख्येवर असताना दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) व शाहबाज अहमद हे राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांवर तुटून पडले. या दोघांनी ३३ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी करून RCBला गमावलेला सामना जिंकून दिला.

3 / 9

या विजयासह RCBने गुणतालिकेत ६ वे स्थान पटकावले. IPL 2022 Points Table मध्ये आता सहा संघांच्या खात्यात प्रत्येकी ४, एक संघाच्या खात्यात दोन गुण आहेत. पण, तीन सघांना अजूनही गुणखाते उघडता आलेले नाही.

4 / 9

यशस्वी जैस्वाल ( ४) आणि कर्णधार संजू सॅमसन ( ८) हे वगळल्यास राजस्थानच्या देवदत्त पडिक्कल, जोस बटलर व शिमरोन हेटमायर यांनी सुरेख खेळ केला. बटलर व पडिक्कल या जोडीने मग ४९ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली.

5 / 9

देवदत्त २९ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून माघारी परतला. बटलर व हेटमायर यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ४२ धावा कुटल्या. बटलर ४७ चेंडूंत ६ षटकारांसह ७०,तर हेटमायर ३१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर नाबाद राहिला. राजस्थान रॉयल्सने ३ बाद १६९ धावा केल्या.

6 / 9

लक्ष्याचा पाठलाग करताना फॅफ ड्यू प्लेसिस ( २९) व अनुज रावत ( २६) यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करून दमदार सुरूवात केली. पण, ७व्या षटकात युझवेंद्र चहलने RCBला पहिला धक्का दिला. त्यानंतर ५ विकेट्स पटापट पडला. विराट कोहली ( ५) धावबाद झाला, डेव्हिड विलीचा ( ०) त्रिफळा उडवला आणि शेरफाने रुथरफोर्डचा ( ५) अफलातून झेल नवदीप सैनीने टिपला.

7 / 9

५ बाद ८७ अशा धावसंख्येवर RCB असताना दिनेश कार्तिक व शाहबाज अहमद ही जोडी जमली. अहमद २६ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावांवर बाद झाला. कार्तिकने नंतर RCBचा विजय पक्का केला. कार्तिक २३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४४ धावांवर नाबाद राहिला. RCBने हा सामना ४ विकेट्स व ५ चेंडू राखून जिंकला.

8 / 9

आजच्या पराभवानंतरही राजस्थान रॉयल्स ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात २, तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांना खाते उघडताच आलेले नाही.

9 / 9

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्सदिनेश कार्तिकयुजवेंद्र चहल
Open in App