Join us  

Faf Du Plessis Net Worth, IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस आहे कोट्याधीश, जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 10:33 PM

Open in App
1 / 10

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ( RCB) इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी नवा कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) याच्या नावाची घोषणा केली. विराट कोहलीने २०२१मध्ये RCBचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती.

2 / 10

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये RCBने ७ कोटी रुपये मोजून फॅफला आपल्या ताफ्यात दाखल केले.

3 / 10

फॅफने २०२१च्या आयपीएलमध्ये CSKसाठी १६ सामन्यांत ६३३ धावा कुटल्या होत्या आणि जेतेपदात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने एकूण १०० सामन्यांत २९३५ धावा केल्या आहेत आणि त्यात २२ अर्धशतकांचा समावेश आहे

4 / 10

ड्यू प्लेसिसने २००४ साली स्थानिक क्रिकेटमध्ये टायटन्स संघाकडून सुरुवात केली होती. ६ महिन्यांच्या कोलपॅक करारानंतर तो इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये लँकशायर क्लबकडूनही खेळला होता. त्यानंतर त्याचा हा करार तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला.

5 / 10

प्रिटोरिया येथे जन्मलेल्या ड्यू प्लेसिसने १८ जानेवारी २०११ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यात त्यानं नाबाद ६० धावा केल्या होत्या. त्याच वर्षी त्याला दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कप संघातही संधी मिळाली होती. त्याने ट्वेंटी-२० पदार्पणही त्याच वर्षी केले.

6 / 10

२०११मध्ये तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दाखल झाला. त्यानंतर CSKवर बंदी असताना तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला होता. २०१८मध्ये त्याला चेन्नईने १.६ कोटींत पुन्हा लिलावात ताफ्यात घेतले.

7 / 10

ड्यू प्लेसिस जगभरातील अनेक ट्वेंटी-२० लीगमध्ये खेलतो आणि त्याची एकूण संपत्ती १४ मिलियन म्हणजेच १०२ कोटी इतकी आहे.

8 / 10

२०१३ साली त्याने गर्लफ्रेंड इमारी व्हिसेरसह लग्न केले. या दोघांना २०१७मध्ये एलिमी आणि २०२०मध्ये जोई नावाच्या मुली झाल्या.

9 / 10

10 / 10

टॅग्स :एफ ड्यु प्लेसीसआयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरद. आफ्रिका
Open in App