Join us  

Why Suresh Raina went unsold?: आयपीएल २०२२ लिलावात सुरेश रैना अनसोल्ड का राहिला?; समोर आले महत्त्वाचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 1:00 PM

Open in App
1 / 7

Why Suresh Raina went unsold? - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेला मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैनावर न लागलेली बोली सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली. पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेल्या रैनाला दुसऱ्या फेरीत Chennai Super Kings घेईल, अशी आशाही फोल ठरली.

2 / 7

आयपीएल २०२२मध्ये नव्याने दाखल झालेला लखनौ सुपर जायंट्स स्थानिक खेळाडू रैनाला ताफ्यात घेतील, हेही तर्क अपयशी ठरले. Mr IPL सुरेश रैनाचे अनसोल्ड राहणे अनेकांसाठी धक्का देणारे ठरले. सुरेश रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या.

3 / 7

सुरेश रैनाने आयपीएलमध्ये एकूण २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत.

4 / 7

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रैना चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली ( ६२८३), रोहित शर्मा ( ५७८४) व शिखर धवन (५६११) हे आघाडीवर आहेत. तरीही सुरेश रैना अनसोल्ड का राहीला?

5 / 7

“ या गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. जसजशी वर्षे सरतात तसतसे खेळाडू बदलतात आणि युवा खेळाडूंद्वारे प्रतिष्ठा देखील नवीन बनवली जाते. सुरेश रैनाच्या बाबतीत, आयपीएलमधील त्याची प्रतिष्ठा अविश्वसनीय आहे. तो Legend आहे. प्रत्येक हंगामात त्याची कामगिरी उंचावत गेली आहे,''असे राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा म्हणाला.

6 / 7

“जेव्हा तुम्ही बारीकसारीक तपशिलात जाता, तेव्हा कदाचित सुरेश रैना या हंगामासाठी योग्य नसावा. सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असणे किंवा खेळाडू उच्च दर्जाचा असणे याने फार फरक पडत नाही. विश्लेषक, प्रशिक्षक आणि मालक काय विचार करतात यावर सर्व अवलंबून असते,” असे कुमार संगकाराने सांगितले.

7 / 7

चेन्नई सुपर किंग्सचा माजी उप कर्णधार आयपीएल २०२२त समालोचकाच्या भूमिकेत पदार्पण करणार आहे. यावेळी तो भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत क्रिकेट सामन्यांचे हिंदीत समालोचन करणार आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन सध्या न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत समालोचन करत असल्याने ते आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार नाही. पण, केव्हीन पीटरसन, मार्क निकोलस, इयान बिशॉप, डॅनी मॉरिसन, सिमोन डॉल, मिचेल स्लॅटर हे समालोचन करताना दिसतील. हिंदी समालोचक - आकाश चोप्रा, इरफान पठाण, गौतम गंभीर, पार्थिव पटेल, निखिल चोप्रा, तान्या पुरोहित, किरण मोरे, जतिन सप्रू, सुरेश सुंदरम, रवी शास्त्री व सुरेश रैना

टॅग्स :सुरेश रैनाआयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स
Open in App