Join us  

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : MS Dhoni ने केली कमाल, अखेरच्या तीन षटकांत उडवली धमाल; नोंदवला मोठा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 9:46 PM

Open in App
1 / 8

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने ( Kolkata Knigth Riders) आयपीएल २०२२च्या पहिल्याच सामन्यात घेतलेल्या मेहनतीवर चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पाणी फिरवले. १७व्या षटकापर्यंत ५ बाद ८४ धावा असलेल्या CSKने अखेरच्या तीन षटकांत खोऱ्याने धावा चोपल्या. २५ चेंडूंत १५ धावांवर खेळणाऱ्या धोनीने त्या तीन षटकांत दमदार खेळ केला आणि संघाला ५ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारून दिली.

2 / 8

उमेश यादवने चेन्नई सुपर किंग्सला सुरुवातीचे दोन धक्के दिले. ऋतुराज गायकवाड ( ०) व डेव्हॉन कॉनवे ( ३) हे बाद झाल्यानंतर रॉबिन उथप्पा व अंबाती रायुडू यांनी डाव सावरला होता. पण, रॉबिन उथप्पा २८ धावांवर बाद झाला. वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर तो चुकला अन् यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सनने चपळाईने त्याला बाद केले. अंबाती रायुडू ( १५) धावबाद झाला. शिवम दुबे ( ३) माघारी परतल्याने चेन्नईची अवस्था ५ बाद ६१ धावा अशी झाली होती.

3 / 8

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ११ व्या षटकात मैदानावर आला अन् प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. टाळ्यांचा कडकडाटाने वानखेडे स्टेडियम दणाणून गेले.

4 / 8

धोनीने दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले, हे त्याचे २४वे आयपीएल अर्धशतक ठरले. चेन्नईने ५ बाद १३१ धावा केल्या. धोनी ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर नाबाद राहिला, तर जडेजाने २६ धावा केल्या.

5 / 8

आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा धोनी हा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू ठरला. धोनीने ४० वर्षे व २६२ दिवसांचा असताना हा पराक्रम करताना राहुल द्रविडचा ( ४० वर्ष व ११६ दिवस) विक्रम मोडला.

6 / 8

आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा वयस्कर खेळाडू हा अॅडम गिलख्रिस्ट आहे. त्याने ४१ वर्ष व १८१ दिवसांचा असताना ही कामगिरी केली होती. त्यानंतर ख्रिस गेल ( ४१ वर्ष व ३९ दिवस) याचा क्रमांक येतो. सचिन तेंडुलकर ( ३९ वर्ष व ३६२ दिवस) या यादीत पाचवा येतो.

7 / 8

ऋतुराज सलग तिसऱ्या पर्वात पहिल्याच सामन्यात भोपळ्यावर बाद झालाय, पण त्यानंतर त्याची बॅट चांगली तळपलीय. २०२०मध्ये त्याने अखेरच्या सामन्यांत ६५,७२ व ६२ अशा धावा केल्या होत्या, आयपीएल २०२१मध्ये तो ऑरेंज कॅप विनर ठरला होता.

8 / 8

आयपीएलमध्ये सर्वाधिक २०० सामने खेळल्यानंतर कर्णधार बनलेला रवींद्र जडेजा हा पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी मनिष पांडेने १५३ सामने खेळल्यानंतर कर्णधारपद भूषविले होते. किरॉन पोलार्डलाही कर्णधार बनण्यासाठी १३७, आर अश्विनला १११, संजू सॅमसनला १०७ व भुवनेश्वर कुमारला १०३ सामने खेळावे लागले.

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App