Join us  

IPL 2023: १६ सीझन अन् झीरो ट्रॉफी, आतापर्यंत RCB च्या हाती निराशा का?; 'हे' आहे प्रमुख कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 12:14 PM

Open in App
1 / 10

रविवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) ६ गड्यांनी नमवले. यामुळे आरसीबीचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. गुजरातच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये एन्ट्री मिळाली.

2 / 10

प्ले ऑफ गाठण्यासाठी आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे गरजेचा होता. स्टार फलंदाज विराट कोहलीच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने जवळजवळ अर्धी लढाई जिंकली होती. परंतु, यानंतर शुभमन गिलने त्याच तोडीची खेळी करत नाबाद शतक झळकावत गुजरातला विजयी केले.

3 / 10

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) २००८ पासून आयपीएल(IPL) खेळत आहे. सुरुवातीला संघात जॅक कॅलिस, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, मार्क बाउचर आणि डेल स्टेनसारखे खेळाडू होते. त्यानंतर विराट कोहलीने रन्स करण्यास सुरुवात केली.

4 / 10

ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्ससारखे टी-20 भयंकर फलंदाज संघाचा भाग होते. सध्या फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल आहेत. गोलंदाजीत झहीर खानपासून युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराजपर्यंत संघाचा भाग आहेत. दरवर्षी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आरसीबी संघ विजयाचा दावेदार असतो पण शेवटी निराशाच हाती लागते.

5 / 10

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्याकडे देशांतर्गतचा भारतीय फलंदाज नाही. या संघाने २००८ मध्ये विराट कोहलीला सोबत जोडले होते. तेव्हा दिल्लीने देशांतर्गत क्रिकेटपटू विराटवर विश्वास ठेवला नाही. आरसीबीने विराटला घेतले आणि आजपर्यंत तो संघासोबत आहे.

6 / 10

पण आरसीबीकडे विराट कोहली व्यतिरिक्त, इतिहासात असा एकही भारतीय फलंदाज नाही, जो अनेक हंगामात सतत संघासोबत राहिला आणि धावा करत राहिला. आजपर्यंत विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्याने आरसीबीसाठी आयपीएलमध्ये हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.

7 / 10

कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या नावावर ७ हजारांहून अधिक धावा आहेत. पण विराटशिवाय दुसरे कोण, याचे उत्तर कोणाकडेच नाही. देवदत्त पडिक्कल आणि केएल राहुल सारख्या फलंदाजांनी काही काळ संघासाठी चांगली कामगिरी केली पण नंतर ते इतर संघात गेले.

8 / 10

RCB साठी IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज विराट कोहली - ७२६३, राहुल द्रविड - ८९८, देवदत्त पडिक्कल - ८८४, पार्थिव पटेल - ७३१, मनदीप सिंग - ५९७ असे फलंदाज होते.

9 / 10

मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यांच्याकडील ७ भारतीय खेळाडूंनी संघासाठी हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. KKR दोन वेळा चॅम्पियन आहे आणि ९ भारतीय फलंदाजांनी त्यांच्यासाठी १०००+ धावा केल्या आहेत. ४ वेळचे चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठीही ७ फलंदाजांनी १००० धावांचा टप्पा पार केला आहे.

10 / 10

सध्या मुंबईत रोहित शर्माशिवाय ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि टिळक वर्मा अशी नावे आहेत. चेन्नईकडे रुतुराज गायकवाड, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी, जडेजा आणि शिवम दुबे आहेत. त्याचबरोबर आरसीबीमध्ये विराटशिवाय दिनेश कार्तिकही मोठे नाव आहे. हेच मोठे कारण आहे ज्याने आतापर्यंत संघाला विजेतेपद मिळवू दिले नाही.

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली
Open in App