Join us  

IPL 2023 Auction : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप गाजवणारे हे स्टार आयपीएल ऑक्शनमध्ये होणार मालामाल, फ्रँचायझी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 4:35 PM

Open in App
1 / 7

IPL 2023 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठीचे मिनी ऑक्शन शुक्रवारी कोची येथे होणार आहे. त्यासाठी सर्व दहा फ्रँचायझींचे प्रतिनिधि केरळ येथे दाखल झाले आहेत आणि आज मॉक ऑक्शन ( लिलावाची रंगीततालिम) होणार आहे. या लिलावात ३६९ खेळाडूंवर बोली लागणार आहे.

2 / 7

फ्रँचायाझींनी अतिरिक्त ३६ खेळाडूंची नावं सुचवली आहेत आणि त्यामुळे खेळाडूंची संख्या ४०५ अशी झाली आहे. यामध्ये २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ११९ खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळले आहेत आणि २८२ खेळाडूंना अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यापैकी ८७ खेळाडूंनाच संधी मिळणार आहे.

3 / 7

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत झिम्बाब्वेने मोठा अपसेड घडवला होता आणि त्यांनी पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता.अष्टपैलू सिकंदर रझाने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली होती

4 / 7

सिकंदरने या स्पर्धेत ७ सामन्यांत १४७ च्या स्ट्राईक रेटने आणि ३१ च्या सरासरीने २१९ धावा केल्या. रझा सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. त्याने १० विकेट्सही घेतल्या. रझा आयपीएलमध्ये ५० लाखांच्या मूळ किमतीत उपलब्ध आहे.

5 / 7

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आयर्लंडचा फलंदाज लार्कन टकरच्या धावांचा पाऊस पाडला. या संघाने वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांना पराभूत केले.टकरने सात सामन्यांमध्ये ४० पेक्षा जास्त सरासरी आणि १२५ च्या स्ट्राइक रेटने २०४ धावा केल्या. या संघाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. टॉप ऑर्डर बॅट्समन टकर आयपीएलमध्ये ५० लाखांच्या मूळ किमतीत उपलब्ध आहे.

6 / 7

आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोश लिटलने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली. त्याने केन विल्यमसन, जीमी नीशम आणि मिचेल सँटनरचे यांना बॅक टू बॅक माघारी पाठवले होते. जोश हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तो ५० लाखांच्या मूळ किमतीत उपलब्ध आहेत. लिटनने वर्ल्ड कप स्पर्धेत सात सामन्यांत ११ विकेट घेतल्या.

7 / 7

मूळचा चेन्नईचा असलेला कार्तिक मयप्पन यूएईकडून खेळतो. या लेगस्पिनरने श्रीलंकेसारख्या मोठ्या संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत अडचणीत आणले. मयप्पनने श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. कार्तिक फक्त २० लाखांच्या मूळ किमतीत उपलब्ध आहे.

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App