Join us  

CSK च्या शिलेदारांचा २ तारखेला विशेष सन्मान; तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 6:17 PM

Open in App
1 / 10

आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत गतविजेत्या गुजरात टायटन्सला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा किताब पटकावला. रवींद्र जडेजाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयी चौकार लगावून आयपीएलला सोळावा चॅम्पियन दिला.

2 / 10

अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला अन् पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एवढ्या उशिरापर्यंत सामना खेळवला गेला.

3 / 10

पावसाच्या व्यत्ययामुळे रविवारी होणारा सामना सोमवारी घेण्यात आला. पहिला डाव झाल्यानंतर सोमवारी देखील पावसाने बॅटिंग करण्यास सुरूवात केली आणि खेळाडूंना बाकावर बसावे लागले. पहिला डाव संपल्यानंतर पाऊस आल्याने सामना मध्यरात्रीपर्यंत चालला.

4 / 10

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चॅम्पियन चेन्नईच्या संघाचा २ जून रोजी विशेष सन्मान होणार आहे. CSK च्या शिलेदारांचा सन्मान करण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची उपस्थिती असणार आहे.

5 / 10

न्यूज १८ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, २ जून रोजी चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित सन्मान होणार आहे. एमके स्टॅलिन जपान दौऱ्यावरून परतल्यानंतर हा कार्यक्रम होणार आहे.

6 / 10

सोमवारी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. आयपीएल २०२३ चा संपूर्ण हंगाम महेंद्रसिंग धोनी या नावाभोवती राहिला. पण फायनलच्या सामन्यात धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मोहित शर्माने गतविजेत्यांना खुशखबर देताना सलग दोन चेंडूवर दोन बळी घेतले.

7 / 10

धोनी पहिल्याच चेंडूवर मोहितचा शिकार झाला अन् स्टेडियममध्ये एकच शांतता पसरली. पण रवींद्र जडेजा गुजरातसाठी काळ ठरला आणि त्यानं अखेरच्या २ चेंडूमध्ये १० धावा चोपून सामना आपल्या नावावर केला.

8 / 10

गुजरात टायटन्सला अखेरच्या चेंडूवर पराभूत करून धोनीच्या चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचा किताब उंचावला. अखेरच्या षटकांतील शेवटच्या २ चेंडूवर १० धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने अनुभवाचे कौशल्य दाखवले.

9 / 10

मोहित शर्माच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं चाहत्यांना जागं केलं. तर, अखेरचा चेंडू जड्डूच्या पायाला लागून सीमीरेषेकडे गेला अन् चेन्नईच्या खेळाडूंसह चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

10 / 10

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईला पाचवेळा किताब जिंकण्यात यश आले असून त्यांनी मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी सर्वाधिक ५-५ वेळा स्पर्धेचा किताब जिंकला आहे.

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीतामिळनाडूगुजरात टायटन्स
Open in App