Join us  

कोरोना काळात वडिलांना गमावलं, ६ महिन्यांपूर्वी आईला कॅन्सर झाल्याचं समोर आलं! राजवर्धन हंगरगेकरचा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 5:38 PM

Open in App
1 / 6

राजवर्धनने पहिल्या सामन्यात ३ विकेट्स घेत धोनीचा विश्वास सार्थ ठरवला अन् काल डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. दरम्यान, CSK vs LSG या सामन्यात समालोचन करणाऱ्या पुणेकर केदार जाधव याने हंगरगेकरच्या खडतर प्रवासाबद्दल चाहत्यांना सांगितले.

2 / 6

राजवर्धन हंगरगेकर अवघ्या २१ वर्षांचा आहे आणि कोरोना काळात त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याच वर्षी त्याचे १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. वडिलांनीच क्रिकेटपटू बनण्यास त्याला प्रोत्साहन दिले होते. पण, भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झालेले पाहण्यासाठी ते हयात नाही.

3 / 6

राजवर्धन हंगरगेकरने १९ वर्षांखालील विनू मंकड ट्रॉफीत २१६ धावा केल्या आणि १९ विकेट्स घेत आपले नाणे खणखणीत वाजवले. त्यानंतर भारत C संघाकडून खेळताना त्याने १९ वर्षांखालील चॅलेंजर्स ट्रॉफीत चार विकेट्स घेतल्या. तो योगोयोगाने जलदगती गोलंदाज बनला.

4 / 6

उस्मानाबादच्या १४ वर्षांखालील संघात खेळताना तो ऑफ स्पिन करायचा, परंतु त्याच्या संघात जलदगती गोलंदाज नव्हता आणि त्यामुळे त्याने जलदगती गोलंदाजी सुरू केली. पुण्यातील मोहन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने प्रशिक्षण सुरू केले.

5 / 6

आयपीएलच्या लिलावात चेन्नईच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात घ्यायचे ठरवले आणि त्याच्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये मोजले. राजवर्धन त्याच्या पहिल्याच आयपीएलमध्ये करोडपती झाला होता.

6 / 6

काल सामन्या दरम्यान केदार जाधवने सांगितले की ६ महिन्यांपूर्वी राजवर्धनच्या आईला कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. अनेक आव्हानांचा सामना करून २१ वर्षीय गोलंदाज मैदानावर शंभर टक्के योगदान देतोय... त्याच्या गोलंदाजीच्या शैलीची तुलना जसप्रीत बुमराह याच्यासोबत होतेय.

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहाराष्ट्र
Open in App