Join us  

'रिझर्व्ह डे' ला फायनल, प्ले ऑफमध्ये ५ विकेट्स; IPLच्या इतिहासात यंदा प्रथमच घडले हे १० विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 3:53 PM

Open in App
1 / 10

सलामीचा व अंतिम सामना - आयपीएल २०२३ मधील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. याच दोन संघांमध्ये अहमदाबाद येथेच फायनल झाली.

2 / 10

प्ले ऑफमध्ये ५ विकेट्स - मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज आकाश मढवाल याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये प्रथमच प्ले ऑफ सामन्यात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम झाला. क्लालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरात टायटन्सच्या मोहित शर्मानेही पाच विकेट्स घेतल्या.

3 / 10

शतकांची हॅटट्रिक - आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात तीन शतकं पाहायला मिळाली. २१ मे रोजी मुंबई इंडियन्सच्या कॅमेरून ग्रीनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतक झळकावले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विराट कोहली आणि गुजरात टायटन्सकडून शुबमन गिलने शतकी खेळी केली.

4 / 10

सर्वाधिक शतकं - आयपीएल २०३ मध्ये सर्वाधिक ११ शतकं पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूकने यंदाच्या पर्वातील पहिले शतक झळकावले. शुबमन गिलने तीन, विराट कोहलीनं दोन शतक झळकावले. यासिवाय सूर्यकुमार यादव, प्रभसिमरन सिंग, यशस्वी जैस्वाल, कॅमेरून ग्रीन व हेनरिच क्लासेन यांनी शतकं झळकावली. २०२२ मध्ये सर्वाधिक ८ शतकं झाली होती.

5 / 10

सर्वाधिक ५०+ धावा - आयपीएल २०२३ मध्ये १५३ वेळा फलंदाजांनी ५०+ धावा केल्या आहेत. २०२२मध्ये ११८ वेळा असा पराक्रम झाला होता.

6 / 10

सर्वाधिक षटकार - आयपीएल २०२३ मध्ये सर्वाधिक १११६ षटकार केचले गेले. एका पर्वातील ही सर्वाधिक षटकारांची संख्या आहे. यापूर्वी २०२२ मध्ये १०६२ षटकार खेचले गेले होते.

7 / 10

सर्वाधिकवेळा २००+ धावांचा पाठलाग - आयपीएल २०२३ मध्ये ३७ वेळा २००+ धावा उभारल्या गेल्या आणि त्यापैकी ८ वेळा संघांनी यशस्वी धावांचा पाठलाग केला. यापूर्वी २०१४ मध्ये ३ वेळा २००+ धावांचे लक्ष्य पार केले गेले होते.

8 / 10

कनक्शन सबस्टीट्यूड - क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक इशान किशन याच्या डोळ्यावर ख्रिस जॉर्डनचा कोपरा लागला अन् त्याला दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. त्याच्याजागी कनक्शन सबस्टीट्यूड म्हणून विष्णु विनोद फलंदाजीला आला.

9 / 10

प्ले ऑफमध्ये सर्वाधिक धावसंख्या - गुजरात टायटन्सने क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ३ बाद २३३ धावांचा डोंगर उभा केला. प्ले ऑफमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

10 / 10

रिझर्व्ह डे ला फायनल - आयपीएल २०२३ ची फायनल रविवारी पावसामुळे होऊ शकली नाही. सोमावारी गुजरात टायटन्सच्या फलंदाजीनंतर पाऊस सुरू झाला अन् मंगळवारी मध्यरात्री चेन्नई सुपर किंग्सचा संघ धावांचा पाठलाग करायला मैदानावर उतरला.

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स
Open in App