Join us

IPL 2023: 'या' ४ खेळाडूंच्या कामगिरीवर मुंबई इंडियन्सचं भविष्य; एकाला तर रोहित शर्माहून जास्त पैसे मिळतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 13:41 IST

Open in App
1 / 9

'दुनिया हिला देंगे वाली'ची टीम मुंबई आता 'जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान' म्हणत आहे. पाचवेळच्या चॅम्पियन संघाला आपला तोच दर्जा परत मिळवायचा असेल, तर त्यांना यावेळी जीवाची बाजी लावावी लागेल.

2 / 9

गेल्या वेळी मुंबई इंडियन्स संघ अपयशी ठरला. मुंबई टीमला पाँईट टेबलमध्ये खालच्या स्तरातून पुन्हा सर्वोच्च स्थान गाठण्यासाठी आखलेल्या मोहिमेला नवी जोड द्यावी लागणार आहे. तसे, यावेळी त्यांच्यावर आणखी एक दबाव असेल.

3 / 9

मुंबई इंडियन्स महिला संघाने महिला प्रीमियर लीग चॅम्पियनचा मुकुट पटकावल्याने चाहत्यांना पुरुष संघाकडूनही अशीच अपेक्षा असेल. कॅमेरून ग्रीनप्रमाणेच ईशान किशनही मोठ्या रकमेत संघात सामील झाला आहे.

4 / 9

किशनने बांगलादेशमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक द्विशतक झळकावले. तेव्हापासून तो धावा काढण्यासाठी धडपडत आहे. या फलंदाजाकडून मुंबई इंडियन्सला मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. हा फलंदाज अपयशी ठरला तर मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट होऊ शकते.

5 / 9

टीमचे फिरकी आक्रमण अत्यंत कमकुवत मानले जात आहे. लेग स्पिनर पियुष चावला हा मोठा स्पिनर म्हणून २०२१ मध्ये शेवटचा आयपीएल खेळला आणि त्यानंतर त्याला CSK कडून फक्त एकच सामना खेळायला मिळाला.

6 / 9

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या लिलावात कॅमेरून ग्रीनसाठी संघाने १७.५० कोटी रुपये खर्च केले होते. संघात कायरॉन पोलार्डची उणीव तो भरून काढेल. पोलार्ड संघाचा फलंदाजी प्रशिक्षक झाला आहे. जर ग्रीन फ्लॉप झाला, तर रोहित शर्मापेक्षा जास्त पैसे देणे फ्रँचायझीला खूप महागात पडू शकते.

7 / 9

रोहित शर्माला त्याच्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच गेल्या मोसमात एकही अर्धशतक ठोकता आले नाही. यंदाच्या मोसमात रोहित शर्माच्या फलंदाजीची आणि कर्णधारपदाचीही कसोटी लागणार आहे.

8 / 9

आयपीएलचे यश पाहून रोहितला टीम इंडियाचा कर्णधारही बनवण्यात आले. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या टी-२० विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवता आले नव्हते. कर्णधार रोहित काही काळापासून रन्स बनवतोय पण त्याला चांगली सुरुवात मोठ्या डावात करता आली नाही.

9 / 9

इशान किशनचीही अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी झालेली नाही, तर एकदिवसीय मालिकेत अपयशी ठरल्यानंतर सूर्यकुमार यादववर प्रचंड दबाव असेल. त्यामुळे यंदा मुंबई इंडियन्स कशी कामिगिरी करते ते पाहणे गरजेचे आहे.

टॅग्स :मुंबई इंडियन्सरोहित शर्माइशान किशनसूर्यकुमार अशोक यादव
Open in App