Join us  

IPL 2023, MI vs DC Live : १ चेंडू २ धावा हव्या असताना तुम्ही काय केलं असतं? टीम डेव्हिडने नेमकं उलटं केलं; जाणून घ्या टर्निंग पॉईंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 11:47 PM

Open in App
1 / 6

डेव्हिड वॉर्नरने ( ५१) पुन्हा एकदा उपयुक्त खेळी केली आणि यावेळेस त्याला उप कर्णधार अक्षर पटेलची ( ५४) साथ मिळाली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. पीयुष चावलाने ( Piyush Chawla) ३ धक्के दिले मधल्या षटकांत DC ने डोके वर काढले. जेसन बेहरेनडॉर्फने १९व्या षटकात मुंबईला चार विकेट्स मिळवून देताना लक्ष्य थोडे कमी केले. १८ व्या षटकात ५ बाद १६५ धावा असणारा दिल्लीचा संघ पुढील १० चेंडूंत ७ धावा करून माघारी परतला. जेसन बेहरेनडॉर्फने ३ षटकांत २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. रिले मेरिडिथने शेवटची विकेट घेताना दिल्लीचा डाव १९.४ षटकांत १७२ धावांवर गुंडाळला.

2 / 6

मुंबई इंडियन्ससमोर १७३ धावांचे लक्ष्य होते. ५ वेळच्या विजेत्या MIची फलंदाजांची फौज पाहता हे लक्ष्य त्यांच्यासाठी सहज शक्य होते. रोहित शर्मा व इशान किशन ( ३१) यांनी तशी आश्वासक सुरूवातही करून दिली होती. त्यात तिलक वर्माने जबरदस्त फटकेबाजी करून मॅच MI च्या हातात आणून ठेवली.

3 / 6

तरीही दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी अखेरच्या चेंडूपर्यंत सामना नेला... मोक्याच्या क्षणी तिलक वर्माची ( ४१) विकेट पडली, त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव पुन्हा गोल्डन डकवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माला ( ६५) DC गोलंदाज मुस्ताफिजूरने तंबूचा रस्ता दाखवला.

4 / 6

रोहित बाद झाला तेव्हा मुंबईच्या ४ बाद १४३ धावा झाल्या होत्या आणि त्यांना २५ चेंडूंत ३० धावा करायच्या होत्या. टीम डेव्हिड इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला अन् यावेळेत कॅमेरून ग्रीनही बरा खेळला. १२ ते १४ अशा तीन षटकांत मुंबईला ११ धावाच करता आल्या होत्या आणि त्याचं दडपण तिलकच्या विकेटसाठी कारणीभूत ठरलं.

5 / 6

अखेरच्या षटकात ५ धावा ज्या सहज शक्य होत्या, त्याही करण्यासाठी एनरिच नॉर्खियाने मुंबईला घाम गाळायला लावला. मुकेश कुरमाच्या हातून कॅमेरून ग्रीनचा झेल सुटला. तिसऱ्या चेंडूवर अम्पायरने Wide चेंडू दिला अन् वॉर्नरच्या DRS मुळे निर्णय बदलला गेला. ३ चेंडूंत ४ धावा मुंबईला करायच्या होत्या. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना ग्रीन व टीम डेव्हिड यांनी त्या काढल्या अन् मुंबईने विजय मिळवला.

6 / 6

टीम डेव्हिडने मोठा फटका न मारता लाँग ऑफच्या दिशेने सहज ढकलला. लाँग ऑफचा क्षेत्ररक्षक बराच मागे असल्याचा अंदाज त्याने बांधून हा चतुर खेळ केला अन् त्यात तो यशस्वी झाला. डेव्हिडने डाईव्ह मारून दुसरी धाव पूर्ण केली अन् मुंबईने मॅच जिंकली. पोरेलकडे आलेला थ्रो दिशाहीन होता आणि तो टीपून यष्टींवर लावण्यापूर्वीच डेव्हिड क्रिजमध्ये पोहोचला होता.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सरोहित शर्मादिल्ली कॅपिटल्स
Open in App