Join us  

IPL 2023 MI vs SRH: रोहित शर्माच्या डोक्यात नवा प्लॅन? Mumbai Indians ने आधीचा सामना जिंकूनही संघात होऊ शकतो महत्त्वाचा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 3:29 PM

Open in App
1 / 6

Rohit Sharma, Mumbai Indians Playing XI Changes: IPL 2023 मध्ये अखेर मुंबईकडून Arjun Tendulkar ला संधी मिळाली. आता आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. हैदराबादमध्ये हा सामना असणार आहे. मागील सामन्यात मुंबई आणि सनरायझर्स या दोन्ही संघांनी विजय मिळवल्याने ही लय कायम राखण्याकडे त्यांचा कल आहे.

2 / 6

दोन्ही संघांनी सलग दोन पराभवांसह स्पर्धेची सुरुवात केली होती. पण नंतर दोन्ही संघांनी दोन सामने जिंकत पुनरागमन केले. मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी म्हणजे सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतला. त्याने २५ चेंडूत ४३ धावा चोपल्या, त्यामुळे तो संघात कायम राहणार हे निश्चित झाले.

3 / 6

मुंबईच्या संघाने मागील सामन्यात अर्जुन तेंडुलकर आणि डुअन यान्सेन यांना डेब्यू करण्याची संधी दिली. या दोघांनी सामन्यात फारसा प्रभाव पाडला नाही. पण त्यांच्या पदार्पणाची चांगलीच चर्चा रंगली. आता आजच्या सामन्यासाठी कर्णधार रोहितच्या डोक्यात एक नवा प्लॅन असून त्यासाठी तो संघात काही महत्त्वाचे बदल करणार असल्याचे सांगितले जात आहे.

4 / 6

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ- रोहित शर्मा (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग, शम्स मुलानी, रिले मेरेडिथ, नेहल वढेरा , हृतिक शोकीन, अर्शद खान, दुआन जॅन्सन, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.

5 / 6

अर्जुन तेंडुलकरने संघात येण्यासाठी तीन वर्षे वाट पाहिली. पण मुंबईने अखेर रविवारी अर्जुन तेंडुलकरला संधी दिली. त्याने २ षटके टाकली आणि १७ धावा दिल्या. त्याला विकेट घेता आली नाही. पण असे असले तरी त्याला संघाबाहेर काढले जाणार नाही. तसेच दुसरा डेब्यू खेळाडू डुअन यानसेन यालाही संधी दिली जाईल असे बोलले जात आहे.

6 / 6

संघात चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या नेहल वढेराला संघातून बाहेर बसवून त्याच्या जागी कुमार कार्तिकेय किंवा रमणदीप सिंगला संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतल्याने वरची फळी पुन्हा एकदा मजबूत झाली आहे. अशा परिस्थितीत कुमार कार्तिकेयला संधी मिळण्याची शक्यता जास्त असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सरोहित शर्माअर्जुन तेंडुलकरसनरायझर्स हैदराबाद
Open in App