Cricket Buzz»फोटो गॅलरी »राजस्थान रॉयल्सचे फटके, मुंबई इंडियन्सला 'चटके'! Play Off च्या शर्यतीतून KKR ९५% OUT!राजस्थान रॉयल्सचे फटके, मुंबई इंडियन्सला 'चटके'! Play Off च्या शर्यतीतून KKR ९५% OUT! By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 11:20 PMOpen in App1 / 6यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) आणि संजू सॅसमन यांनी आज इडन गार्डन गाजवले. या दोघांनी ७० चेंडूंत १२१ धावांची भागीदारी करून राजस्थान रॉयल्सला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. कोलकाता नाइट रायडर्सचे १५० धावांचे लक्ष्य RR ने १३.१ षटकांत सहज पार केले. 2 / 6वेंकटेश अय्यर ( ५७ ) वगळल्यास KKRकडून कोणाला फार कमाल करता आली नाही. RRच्या गोलंदाजांनी कमाल केलीच, परंतु त्यांना खेळाडूंनी अफलातून झेल व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून दर्जेदार साथ दिली. युजवेंद्र चहलने ४ विकेट्स घेताना आयपीएल इतिहासात सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम नावावर केला. कोलकाताला ८ बाद १४९ धावांवर समाधान मानावे लागले. 3 / 6यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात २६ धावा कुटल्या. हर्षित राणाच्या दुसऱ्या षटकात जेसन रॉय ( ०) रन आऊट झाला, परंतु यशस्वीने शेवटच्या दोन चेंडूंवर त्यालाही झोडले. यशस्वीने १३ चेंडूंत अर्धशतक झळकावताना आयपीएल इतिहासातील वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. संजूने २९ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४८ धावा केल्या. यशस्वीने ४७ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ९८ धावा केल्या. 4 / 6राजस्थान रॉयल्सने आजच्या विजयानंतर Point Table मध्ये मुंबई इंडियन्सला मागे ढकलून तिसऱ्या स्थानी झेप घेतली. १२ सामन्यातील RRचा हा सहावा विजय ठरला अन् १२ गुण व +०.६३३ नेट रन रेटसह त्यांनी तिसऱ्या स्थानी झेप घेतली. मुंबईचे ११ सामन्यांत १२ गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट हा -०.२५५ असा आहे5 / 6गुजरात टायटन्स ( १६) व चेन्नई सुपर किंग्स ( १५) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांना प्ले ऑफमधील स्थान पक्क करण्यासाठी एक विजय पुरेसा आहे. तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी कडवी टक्कर आहे. ११ गुणांसह लखनौ सुपर जायंट्सही या शर्यतीत आहेत.6 / 6आजच्या पराभवाने कोलकाता नाइट रायडर्स ( १२ सामने ५ विजय ७ पराभव १० गुण) ९५ टक्के प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स यांचेही प्रत्येकी १० गुण आहेत, परंतु त्यांच्या हातात ३ सामने अजून आहेत. दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद याचे आव्हान केव्हाच संपल्यात जमा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications