चेन्नई सुपर किंग्सचे दोन सामने ( वि. KKR आणि वि. DC) शिल्लक होते. हे दोन्ही सामने जिंकून तेही क्वालिफायर १ च्या स्पर्धेत स्वतःला कायम राखण्याच्या प्रयत्नात होते. पण, आज त्यांचा पराभव झाला आणि त्यांना आता काही करून दिल्ली विरुद्ध विजय मिळवावा लागेल. मात्र तोही सामना गमावल्यास त्यांना RCB, RR, PBKS यांच्या किमान एका पराभवाची प्रतीक्षा करावी लागेल.
१३ सामन्यांत १२ गुण मिळवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला उर्वरित सामन्यात लखनौवर विजय मिळवावा लागेल आणि त्यांचे १४ गुण होतील, परंतु त्यानंतर त्यांना RRचा RCB कडून, हैदराबादचा गुजरात टायटन्सकडून, लखनौचा मुंबई इंडियन्सकडून, पंजाब किंग्सचा दिल्ली कॅपिटल्सकडून, RCBचा सनरायझर्स हैदराबादकडून, राजस्थानचा पंजाबकडून आणि RCBचा गुजरातकडून पराभव अशा निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. असे झाल्यास पंजाब व कोलकाता यांचे प्रत्येकी १४ गुण होतील आणि त्यानंतर नेट रन रेटवर गणित असेल.
गुजरात टायटन्स ( १६), चेन्नई सुपर किंग्स ( १५), मुंबई इंडियन्स ( १४) व लखनौ सुपर जायंट्स ( १३) हे आघाडीवर आहेत. गुजरातचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांना एक विजय पुरेसा आहे. चेन्नईला शेवटची मॅच जिंकावी लागेल. मुंबईने उर्वरित दोन सामने जिंकल्यास तेही प्ले ऑफसाठी पात्र ठरतील. लखनौलाही दोनपैकी १ किंवा दोन्ही सामने जिंकून टॉप ४ मध्ये स्थान पक्के करता येईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे संघ प्रत्येकी १२ गुणांसह अजूनही शर्यतीत आहेत.
RCB व PBKS यांचे दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांना १२ चे १६ गुण करणे शक्य आहे. त्यामुळे हे दोन्ही सामने जिंकून ते LSGला स्पर्धेबाहेर फेकू शकतील. RCB ने आज राजस्थानला ५९ धावांत गुंडाळून नेट रन रेट चांगला केला आहे आणि पंजाब व त्यांच्यात कोण पुढे जाईल हे नेट रन रेटवरच ठरेल.