IPL 2023 Play Offs Scenario : RCB सॉलिड जिंकले, मुंबई इंडियन्सला मागे टाकले; गणित अटीतटीचे बनले

IPL 2023 Play Offs Scenario : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला.

IPL 2023 Play Offs Scenario : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह RCB ने नेट रन रेटमध्ये चांगली सुधारणा करताना Point Table मध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेताना मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) मागे टाकले.

हेनरिच क्लासेनने ( Heinrich Klaasen) शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने ५ बाद १८६ धावा केल्या. क्लासेन आणि एडन मार्कराम यांनी ७६ धावांची ( ५० चेंडू) भागीदारी केली. क्लासेनने ५१ चेंडूंत १०४ धावा केल्या आणि त्यात ८ चौकार व ६ षटकारांचा समावेश होता. हॅरी ब्रूकने नाबाद २७ धावा करताना हैदराबादला ५ बाद १८६ धावांपर्यंत पोहोचवले.

प्रत्युत्तरात विराट कोहली ( १००) व फॅफ ड्यू प्लेसिस ( ७१) यांनी पहिल्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी करून RCBचा विजय पक्का केला. बंगळुरने १९.२ षटकांत २ बाद १८७ धावा करून सामना जिंकला. RCBने १३ सामन्यांत ७ विजयांसह १४ गुणांची कमाई केली आहे. मुंबई इंडियन्स -०.१२८ नेट रन रेटसह पाचव्या क्रमांकावर सरकला आहे. RCBचा नेट रन रेट ०.१८० असा झाला आहे.

पंजाब किंग्सचा शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे आणि संजू सॅमसनच्या संघालाही विजय मिळवणे महत्त्वाचे आहे. पण, RCB अखेरच्या सामन्यात पराभूत झाल्यास PBKS व RR यांच्या आशा जीवंत राहू शकतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अखेरच्या सामन्यात गुजरात टायटन्स ( गतविजेते प्ले ऑफमध्ये दाखल) यांच्याविरुद्ध खेळायचे आहे.

मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना SRHविरुद्ध होणारा आहे आणि MI ने मोठ्या फरकाने तो जिंकल्यास RCBवर दडपण येऊ शकते. चेन्नई सुपर किंग्स व लखनौ सुपर जायंट्स यांचे प्रत्येकी १५ गुण आहेत. CSK विरुद्ध DC आणि LSG विरुद्ध KKR या लढतीवर अन्य संघांचे गणित अवलंबून असणार आहे.

RCB ने उर्वरित दोन आणि मुंबई इंडियन्सने शेवटची मॅच जिंकल्यास त्यांचे प्रत्येकी १६ गुण होतील. अशावेळी नेट रन रेट निर्णायक ठरेल. त्याआधी CSK ( vs DC) आणि LSG ( vs KKR) यांनी त्यांचा शेवटचा साखळी सामना जिंकला, तर MI व RCB यांच्यापैकी ज्याचा नेट रन रेट जास्त तो प्ले ऑफमध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र ठरेल. मुंबईने मात्र शेवटची मॅच गमावली अन् RCB ने दोन्ही सामने जिंकले, तर ते प्ले ऑफ खेळतील.